स्थानिक

बारामती ग्रामीण रुग्णालयास युवासेनेच्या वतीने पीपीई किट व फेसशिल्ड चे वाटप.

तालुक्यातील वाढता प्रादुर्भाव बघता केले वाटप.

बारामती ग्रामीण रुग्णालयास युवासेनेच्या वतीने पीपीई किट व फेसशिल्ड चे वाटप.

तालुक्यातील वाढता प्रादुर्भाव बघता केले वाटप.

बारामती:-प्रतिनिधी

बारामतीत आज शिवसेनेच्या युवा नेत्यांनी रुई येथील कोविड केअर सेंटर येथे पीपीई कीट व फेसशील्डचे वितरण केले.

बारामतीत कोविड १९ चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून सरकारी दवाखान्यांना सुरक्षेची अधिक गरज दिवसेंदिवस भासू लागली आहे. शिवसेनेच्या वतीने राज्यभर सरकारी दवाखान्यांमध्ये त्यांच्या संघटनेमार्फत आवश्यक ती साधने पुरविली जात आहेत. यासंदर्भात मदतीचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले होते्. त्यास प्रतिसाद देत बारामती तालुक्यातही सेनेचे जिल्हाप्रमुख अॅड. राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा विद्यार्थी सेनेचे युवा अधिकारी विराज भोसले व प्रशांत सावंत यांच्यामार्फत पीपीई कीट व फेसशिल्डचे वितरण करण्यात आले. रुई येथील कोविड केअर सेंटरकरीता ही साधने पुरविण्यात आली. रुई येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुनील दराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही साधने स्विकारली.

दरम्यान शिवसेनेमार्फत वैद्यकीय मदतीवर भर दिला जाणार असल्याची माहिती विराज भोसले यांनी दिली.

Back to top button