कोरोंना विशेष

बारामतीमध्ये पुन्हा एका कोरोना रुग्णांची भर.

काहींचे कोरोना अहवाल प्रतीक्षेत.

बारामतीमध्ये आज पुन्हा एका कोरोना रुग्णांची भर.

काहींचे कोरोना अहवाल प्रतीक्षेत.

बारामती वार्तापत्र 

शहरातील कोरोनारुग्णांच्या संख्येत आज पुन्हा चार जणांची भर पडली. बारामतीतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता ८६ वर जाऊन पोहोचली आहे. दरम्यान, तालुक्यातील कण्हेरी येथे कार्यरत असलेल्या तसेच बारामती एमआयडीसीतील एका कंपनीत कामास असलेल्या एका ४६ वर्षीय महिलेचा आज मृत्यू झाला. या महिलेला इतर कोणताही त्रास नव्हता पण कोरोनाने तिचा मृत्यू झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.

तिच्या मृत्यूने कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता नऊवर गेली आहे.

दरम्यान तालुक्यातील पंचायत समितीत कार्यरत एका पदाधिका-यालाही कोरोनाची लागण झाल्याचे आज निष्पन्न झाले आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा आता शोध सुरु करण्यात आला आहे. काल घेतलेल्या ६९ स्वबपैकी सकाळ ११ वा. पर्यंत ४५ अहवाल प्राप्त झाले होते. त्यात कसब्यातील जामदार रोड येथील एका ३५ वर्षीय युवकासह,तर वणवे मळा कचेरी रोड बारामती ८५ वर्षांचा एक वयोवृध्द नागरिक व शिवनगर भिगवण रोडवरील एका पुरुषाचा समावेश आहे.तसेच फरांदे नगर निंबुत येथील एका वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून उर्वरित काही अहवाल प्रतीक्षेत आहेत.

बारामती पंचक्रोशीच्या विविध भागातून कोरोनाबाधित रुग्ण सापडत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. बाहेरगावी गेलेल्यांसह बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींकडूनही कोरोनाचा प्रसार होऊ लागला आहे.

कोरोनाचा संसर्ग नेमका कोणामुळे होत आहे हे लवकर लक्षात येत नसल्याने संपर्कातील काही जण पॉझिटीव्ह येऊ लागले आहेत.

शहरात अनेक ठिकाणी लॉकडाऊनच्या काळातही लोक घरात बसण्यास तयार नाहीत, विविध कारणांसाठी लोक सर्रास घराबाहेर पडू लागले आहेत, प्रत्येकाने स्वताःची काळजी घेण्याची गरज प्रशासनाने बोलून दाखविली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!