आज पुन्हा २ कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह.
बारामतीतील काल घेतलेल्या नमुन्यांपैकी दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. आज सकाळीच चौघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यानुसार दिवसभरात सहाजणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
आरोग्य प्रशासनाने काल ५९ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. सकाळी चौघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर दुपारी आलेल्या अहवालांमध्ये आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आज दिवसभरात एकूण सहाजण कोरोना बाधित झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
अंगावर दुखणे काढू नका…
बारामतीतील काही कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूमध्ये उशिरा दवाखान्यात दाखल होणे हे प्रमुख कारण आढळून आलं आहे. अंगावर दुखणे काढण्यापेक्षाही तातडीने दवाखाना गाठून डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करावी. वेळेत निदान झाल्यास योग्य ती काळजी घेता येणे शक्य होते, संपर्काचाही धोका कमी होतो. इतर कोणत्याही गोष्टीची भीती मनात न बाळगता ज्यांना लक्षणे आढळतील, त्यांनी तातडीने सल्ला घ्यावा.
– डॉ. मनोज खोमणे, तालुका आरोग्य अधिकारी, बारामती.
नव्याने बाधित रुग्णांमध्ये बारामती शहरातील खंडोबा नगर येथील ३२ वर्षीय युवक आणि कन्हेरी येथील पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील ४६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.