अनाधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल.
बंदीस्त कंपाउंडचा दरवाजा उघडून आज प्रवेश केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.
अनाधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल.
बंदीस्त कंपाउंडचा दरवाजा उघडून आज प्रवेश केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील कारागृहाच्या बाहेरील बंदीस्त कंपाउंडचा दरवाजा उघडून आज प्रवेश केल्या प्रकरणी एकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक प्रमोद पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लाला आत्माराम पाथरकर (रा.आमराई ता.बारामती.जि.पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, आरोपी लाला पाथरकर याने बारामती शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहाच्या बंदिस्त जागेत असणारा दरवाजा उघडून अनाधिकृत प्रवेश केला.त्यास पोलीस कर्मचाऱ्यांनी आत येण्याचे कारण विचारले असता आरोपीची बहिण जेलमध्ये आहे. तिला भेटण्यासाठी आलो आहे. तिला भेटू द्या.असे सांगितले. यावेळी त्यास पोलिसांनी मज्जाव केला असता त्याने हुज्जत घालून आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. तसेच येथील पोलीस कर्मचाऱ्यांना अपमानित करून दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तसेच कोरोना रोगाचा प्रादुर्भाव सुरू असतानाही तोंडास मास्क न लावता कोणत्याही परवानगीशिवाय कारागृहात प्रवेश केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर आरोपीवर विविध कलमान्वये शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक गोरवे करीत आहे.