डॉ.बाबासाहेब ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने बारामतीत एस.टी स्टँड समोर मास्क चे दहन करून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले
रिक्षा चालकांनी सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे.
डॉ.बाबासाहेब ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने बारामतीत एस.टी स्टँड समोर मास्क चे दहन करून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.
रिक्षा चालकांनी सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे.
बारामती:वार्तापत्र
बारामती,दि.२६: गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आली होती.
या लॉकडाऊन च्या काळात राज्यातील सर्वच व्यवहार बंद असल्यामुळे राज्यातील अनेक कुटुंबांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती.
गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील रिक्षा चालकांची आर्थिक परिस्थिती देखील मोठ्या प्रमाणात खालावली आहे.याच निराशेतून लॉकडाऊन च्या काळात आता पर्यंत ८ रिक्षा चालकांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे.
तरी ही राज्य सरकार रिक्षा वाल्यांच्या परिस्थितीला गंभीर्याने घेत नसल्याने आता राज्यातील रिक्षा चालकांनी सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे.काल (दि.२५ जुलै) बघतोय रिक्षावाला महाराष्ट्र राज्य या रिक्षा संघटनेच्या वतीने राज्यभरात आंदोलनाची हाक देण्यात आली होती.त्याचाच भाग म्हणून बारामतीतील डॉ.बाबासाहेब ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने बारामतीत एस.टी स्टँड समोर मास्क चे दहन करून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.
दरम्यान यावेळी,मनोज साबळे. नितीन खडके,योगेश (गोट्या)सोनवणे,अभिजीत भंडारे,सागर सोनवणे,जगन्नाथ (तात्या) चिचंकर,गणेश पवार,किशोर कांबळे,आण्ण संमिदर,सागर कवडे व आदी रिक्षा चालक उपस्थित होते.