प्रशासनाचा हलगर्जीपणा होत असल्याच्या निषेधार्थ स्थानिक महिलांनी पंचायत समितीत आक्रोश आंदोलन केले.
सरपंचही झाल्या हतबल...
प्रशासनाचा हलगर्जीपणा होत असल्याच्या निषेधार्थ स्थानिक महिलांनी पंचायत समितीत आक्रोश आंदोलन केले.
सरपंचही झाल्या हतबल…
बारामती वार्तापत्र
बारामती शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मेडद या गावस पुरेशा सुविधा मिळत नसल्यासह प्रशासनाचा हलगर्जीपणा होत असल्याच्या निषेधार्थ स्थानिक महिलांनी पंचायत समितीत आक्रोश आंदोलन केले.
ग्रामपंचायत कर्मचारी कामावर नसतात, आले तरीही तासाभरात कामे उरकतात, ग्रामसेवक कामे करत नाहीत, वेळेवर येत नाहीत, चार दिवस गावात पाणी नाही, अनेक विकासकामे रखडलेली आहेत, अशा तक्रारींचा पाढाच आज स्थानिक महिलांनी गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांच्यापुढे वाचला. गटविकास अधिकाऱ्यांना काळे फासण्याच्या तयारीनेच महिला आल्या होत्या. मात्र, काळभोर यांनीही कडक भूमिका घेत कायदा हातात घेतल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला.
गावातील विकासकामे व्हावीत, या साठी विनंती, अर्ज व तक्रारी करुन थकलेल्या महिलांनी आज थेट पंचायत समितीत धडक मारली. विकासकामे न होण्यास जबाबदार कर्मचारी व ग्रामसेवकांवर कारवाईची जोरदार मागणी त्यांनी केली. आगामी काळात विषय मार्गी न लागल्यास जबाबदार अधिकारी म्हणून आपल्याला काळे फासले जाईल, असा आक्रमक पवित्रा महिलांनी घेतला होता.
दरम्यान, गटविकास अधिकाऱ्यांनी प्रश्न सोडवण्याऐवजी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप महिलांनी केला, तर गटविकास अधिकाऱ्यांनी याचा इन्कार करत कायदा कोणाला हातात घेऊ दिला जाणार नाही, असे नमूद केले.
सरपंचही झाल्या हतबल…
वारंवार विनंती करूनही विकासकामे होत नसल्याने मेडदच्या सरपंच हतबल झाल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. विकासकामे रखडत असल्याने महिलांचा उद्रेक झाल्याचे या वेळी नमूद केले गेले.