उजनी काठी बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
बिबट्याला जेरबंद करण्याची ग्रामस्थांकडून होत आहे मागणी.
उजनी काठी बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
बिबट्याला जेरबंद करण्याची ग्रामस्थांकडून होत आहे मागणी.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
उजनी पाणलोट क्षेत्रातील भावडी, चांडगाव, वरकुटे बुद्रुक, चितळकर वाडी या परिसरात बिबट्याचा गेल्या एक महिन्या पासून वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
या भागात बिबट्याने शेळ्या मेंढ्या यांच्या कळपावर हल्ला चढवून काही शेतकऱ्यांच्या शेळ्या मेंढ्यांचा फडशा पाडला असल्या कारणाने या भागातील नागरिकांकडून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत असून लोक दहशतीत वावरत आहेत.
गेल्या आठवड्यात (दि.22)जुलै रोजी भावडी येथील सोमनाथ मदने या शेतकऱ्याच्या शेळीचा फडशा बिबट्याने पाडला होता, तर काही ग्रामस्थांनी त्याला स्वतःपाहिल्याचे म्हंटले होते.परंतु आता मात्र चांडगाव येथील परिगाबाई ननवरे यांच्या बोकडाचा त्यांच्या समोर बिबट्याने फडशा पाडला असून कांदलगाव येथील अरुण मुरलीधर राखुंडे यांच्या सहा शेळ्यांचा फडशा बिबट्याने पाडला या परिसरातील शेतकरी,ग्रामस्थ यांच्यामध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण असून बिबट्याला त्वरित वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद करण्याची मागणी होत आहे.
बिबट्या नसल्याचा वनविभागाचा दावा
इंदापूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्याशी संपर्क केला असता वन विभागाला बिबट्या असल्याचे आढळून आले नसून पुरावे प्राप्त नसल्याचे म्हंटले आहे.