इंदापूर तालुक्यात आज पुन्हा पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण,निमगाव केतकी तील एका बड्या राजकीय नेत्याला कोरोनाची लागण.
निमगाव केतकी, कळाशी,भिगवण मध्ये कोरोनाचे नवे रुग्ण.
इंदापूर तालुक्यात आज पुन्हा पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण,निमगाव केतकी तील एका बड्या राजकीय नेत्याला कोरोनाची लागण.
निमगाव केतकी, कळाशी,भिगवण मध्ये कोरोनाचे नवे रुग्ण.
इंदापूर:-प्रतिनिधी
आज दि.30 जुलै रोजी इंदापूर शहरातील एक ही रुग्ण सापडलेला नसून ग्रामीण भागातील कळाशी,भिगवण मध्ये प्रत्येकी एक तर निमगाव केतकी येथील तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
काल कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कातील 11 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते.त्यापैकी पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून सहा जणांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी दिली आहे.
इंदापूर तालुक्यातील आजचे पाच कोरोनाग्रस्त रुग्ण धरून एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 170 वर जाऊन पोहचला आहे.तर आज सायंकाळपर्यंत अजून रिपोर्ट येण्याचे बाकी असल्याची माहिती इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे यांनी दिली आहे.