इंदापूर

इंदापूरातील विचार मंथन ग्रुपचा चौथा वर्धापन दिन साजरा.

विचार मंथन नावाप्रमाणेच विचारांचे मंथन करून सर्वसामान्यांच्या अडचणीत मोलाची मदत करणारा परिवार असल्याचे सर्वसामान्यांचे मत.

इंदापूरातील विचार मंथन ग्रुपचा चौथा वर्धापन दिन साजरा.

विचार मंथन नावाप्रमाणेच विचारांचे मंथन करून सर्वसामान्यांच्या अडचणीत मोलाची मदत करणारा परिवार असल्याचे सर्वसामान्यांचे मत.

इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )

आपण व्हाट्सअँप ग्रुप हे खूप पाहत असतो व काही ग्रुप मध्ये आपण समाविष्ट देखील असतो पण असा आगळावेगळा गोरगरिबांच्या मदतीला धावून येणारा त्यांच्या समस्या सोडवणार ग्रुप आपण कधी पाहिला का? होय,असाच ग्रुप आहे इंदापूरमध्ये, संपूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये या ग्रुपच्या माध्यमातून नेहमीच अडल्यानडल्याल्यांची गोरगरिबांची दखल घेऊन त्यांच्या असणाऱ्या समस्या विचारमंथन नावाच्या ग्रुपच्या माध्यमातून या ग्रुपमधील सदस्यांच्या माध्यमातून सोडविल्या जातात.

कोणत्याही प्रकारची समस्या असो त्याचा इलाज व त्या समस्येचे निवारण या ग्रुपमधील सदस्य हे करत असतात.हा ग्रुप आजच्या दिवशी 31 जुलै 2016 रोजी अँड. राहुल मखरे यांच्या माध्यमातून त्यांच्या विचारातून सुरु झाला होता.या समूहाचा एक जबाबदार सदस्य म्हणून इंदापूर चे मा.नगराध्यक्ष अरविंद वाघ यांनी सुद्धा खूप मोलाचे काम या माध्यमातून केले आहे.हा ग्रूप सुरु करण्यामागचे कारण म्हणजे तालुक्यातील,शहरातील गोरगरिबांची सेवा त्यांना येणाऱ्या अडचणी तसेच समाजातील विद्यार्थी असतील त्यांच्या शाळेचे त्यांच्या कॉलेजचे काही प्रश्न समस्या असतील,त्यांना प्रवेश घेण्यासाठी काय अडचणी असतील, शासकीय प्रशासकीय ठिकाणी गोरगरीब लोकांची अडवणूक पिळवणूक केली जाते आणि ती अडवणूक थांबवण्याकरिता ग्रुपच्या माध्यमातून ग्रुपचे मार्गदर्शक अँड राहुल मखरे असतील तसेच प्रकाश पवार असतील व इतर ग्रुपमधील सदस्य असतील यांच्याकडून न्याय द्यायचे काम होत असते, जिथे अन्याय झाला असेल तिथे हा ग्रुप या ग्रुपमधील सदस्य हे ठामपणे अन्यायग्रस्तांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना न्याय देण्याचे काम करतात. शहरातील,तालुक्यातील विविध नागरी समस्या असतील या समस्या वर या ग्रुपच्या माध्यमातून आवाज उठवला जातो.ज्या विभागाशी समस्या निगडित आहेत या विभागांमध्ये जाऊन अडचणी विषयी विचारपूस व सूचना करून ते काम पूर्ण करून घेतले जाते.गेली चार वर्षे या ग्रुपच्या माध्यमातून समाजसेवा चालू आहे.

संपुर्ण जगावर आलेल्या कोरोना महामारीच्या काळामध्ये सुद्धा या ग्रुप चे काम कौतुकास्पद आहे.
विचार मंथन परिवारामध्ये विविध पक्षाचे पदाधिकारी,वकील,डॉक्टर, पोलीस,नगरसेवक, तहसील कार्यालयातील कर्मचारी, पंचायत समितीतील अधिकारी, शिक्षक,पत्रकार,व्यापारी, लाईट बोर्डातील अधिकारी तसेच समाजसेवक असल्याने कोरोनाच्या काळात यांची खूप मोठी मदत झाली असून गेल्या चार वर्षांपासून अनेक कामात त्यांची मदत झाली आहे.

कोरोनाच्या काळामध्ये लॉकडॉऊन असताना अनेक कुटुंबांना कामधंदा बंद असल्या कारणाने उपासमारीची वेळ आली होती.खूप समस्या निर्माण झाल्या होत्या, लॉकडाउनमध्ये अनेक हातावर पोट असणारे गोरगरीब सर्वसामान्य नागरिक यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. परंतु या ग्रुपच्या माध्यमातून जवळपास एक ते दोन हजार लोकांना मोफत किटचे वाटप अँड.राहुल मखरे यांच्या माध्यमातून ग्रुपच्या सदस्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आले कोणाचीही ही कसली ही समस्या असो हा ग्रुप नेहमी तालुक्यातील अथवा शहरातील जो समस्याग्रस्त आहे, त्याच्या पाठीमागे उभे राहून त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असतो. अशा या विचारमंथन ग्रुपचा आज चौथा वर्धापन दिन आहे. यानिमित्त आज विविध कार्यक्रम घेऊन हा दिवस साजरा करण्यात आला.

या ग्रुपवर दैनंदिन अनेक सामाजिक प्रश्नांवर अथवा अडचणींवर चर्चा चालू असते त्यामुळे तालुक्यातील बऱ्याच राजकीय नेत्यांचे पुढाऱ्यांचे या विचारमंथन ग्रुपकडे बारीक लक्ष असते.
त्यामुळे या ग्रुपची तालुक्यातून आणि शहरातून नेहमी चर्चा असते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!