स्थानिक

टाळेबंदीत बारामती पोलिसांची ‘लाजवाब’ कामगिरी.

अवैद्य व्यवसायांना त्रासलेल्या नागरिकांकडून पोलीस प्रशासनाचे कौतुक.

टाळेबंदीत बारामती पोलिसांची ‘लाजवाब’ कामगिरी.

अवैद्य व्यवसायांना त्रासलेल्या नागरिकांकडून पोलीस प्रशासनाचे कौतुक .

बारामती वार्तापत्र 

बारामती उपविभागातील अवैद्य व्यवसायाला आळा घालण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी सातत्यपूर्ण कठोर कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळे उपविभागात अवैद्य व्यवसाय ब-याच प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे. या अवैद्य व्यवसायांना त्रासलेल्या नागरिकांकडून पोलीस प्रशासनाचे कौतुक होत असून त्यांचे आभार मानले जात आहेत.

 

टाळेबंदीच्या काळात उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती उपविभागातील पोलिसांनी दि. २३ मार्च ते २८ जुलै या तीन महिन्यांच्या काळात बारामती उपविभागाच्या कार्यक्षेञात येणा-या बारामती शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर, वालचंदनगर, इंदापूर, भिगवण या ६ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोपनीय माहिती मिळवून जुगार, दारू, गुटखा, गांजासह कत्तलखाने वाळू अशा अवैद्य व्यवसायांवर कठोर कारवाई करून जवळपास ७०० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल केले असून, त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ३२ लाख ४ हजार ४०७  रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बारामती शहर, बारामती तालुका व वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात टाळेबंदी दरम्यान तब्बल २१४ अवैद्यदारू तर २८ ठिकाणी बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर छापा टाकून ४६१ जणांवर कारवाई केली असून या दोन्ही कारवाईत तब्बल २६ लाख २५ हजार ६९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याच प्रकारची कारवाई वालचंदनगर, इंदापूर व भिगवण पोलिस ठाण्याच्या हद्दीत करून १४८ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून ४ लाख २४ हजार ६०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.यासह उपविभागात गांजा, वाळू, कत्तलखाने या अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर ही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टाळेबंदीच्या काळात बारामती उपविभागात पोलिसांनी अवैद्य दारू, गुटखा, मादक पदार्थ( गांजा), कत्तलखाने, वाळू अशा अवैध व्यवसाय करणा-या ७०३ आरोपींवर ४२३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. व त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ३२ लाख ४ हजार ४०७  रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

……………………………………….
१५ गावठी कट्टे जप्त….
उपविभागातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी टाळेबंदीत गुन्हेगारीशी संबंधित असणा-यांची गोपनीय माहिती घेऊन टाळेबंदी दरम्यान उपविभागातून १५ गावठी कट्टे जप्त करण्यात आले आहेत.

……………………………………….
उपविभागातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याची कारवाई सुरू आहे. अवैध व्यवसाय करणा-यांवर यापुढे तडीपार, मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
नारायण शिरगावकर -(उपविभागीय पोलिस अधिकारी.बारामती)

……………………………………….

बारामती उपविभागात केलेल्या कारवाई-
 
 
अ.नं   कायदा                    एकूण दाखल            आरोपी        एकूण मुद्देमाल
१     महाराष्ट्र जुगार कायदा         ४८                  ३५०          २०२०७३२
२     महाराष्ट्र दारुबंदी कायदा       ५३                 ४००           २९४९०८४
३     अवैध गुटखा                       ०३                  ०४            २३९०९१
४     मादक पदार्थ(गांज्या)            ०५                  ११           ८२०९४०
५     कत्ताल खाना (केसेस)           ०७                 २५           ३०३१०००
६     वाळू                                   ०७                 १३           १२६३५६०
                              एकूण          ४२३                ७०३         १०३२४४०७
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!