आज बारामतीत सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.
काळजी घेण्याचे प्रशासन चे आव्हान.
बारामती:वार्तापत्र
बारामतीत आज एकूण सहाजणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये शहरातील चार आणि डोर्लेवाडी व मुढाळे येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तर इंदापूर तालुक्यातील दोन रुग्णांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.
बारामतीत काल ४७ जणांचे स्वॅब तपासण्यात आले. त्यापैकी २५ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून सहाजणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २२ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये समर्थनगर, तांबेनगर, कचेरी रोड आणि पाटस रोड येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तर ग्रामीण भागातील डोर्लेवाडीसह मुढाळे येथील जायपत्रेवाडी येथील रुग्णांचा समावेश आहे.
तसेच याच तपासणीत इंदापूर तालुक्यातील कळाशी आणि डिकसळ येथील दोन पुरुषांचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.