इंदापूर तालुक्यामधील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दोनशेच्या वर.
आज दिवसभरात 21 नवे रुग्ण.
इंदापूर तालुक्यामधील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दोनशेच्या वर.
आज दिवसभरात 21 नवे रुग्ण.
इंदापूर:प्रतिनिधी
काल कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कातील एकूण 39 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी आज (दि.2 )रोजी सकाळी तब्बल 10 जणांचा कोरोना चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला.
यामध्ये म्हसोबाचीवाडी 2, भिगवण 4, कळाशी 1, इंदापूर शहर 2, निमगाव केतकी 1 या ठिकाणच्या रुग्णांचा समावेश होता.
या दरम्यान आज सकाळी 25 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते.त्यापैकी 11 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली असून यामध्ये इंदापूर शहर 4 , तरंगवाडी 1 , राऊतवस्ती 3 , कुरवली 1 , सुरवड 2 , असे आज सकाळी 10 व सायंकाळी आलेले 11 मिळून तब्बल 21 जणांनाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या एकूण संख्येने दोनशेचा टप्पा ओलांडला आहे.