टिक टॉक च्या तोडीचे नवीन भारतीय अँप्स काढून इंदापूरच्या तरुणाने दिली चीनला टक्कर.
टिक टॉक अँप्स ला पर्याय म्हणून टिक टॅक ची केली निर्मिती.
टिक टॉक च्या तोडीचे नवीन भारतीय अँप्स काढून इंदापूरच्या तरुणाने दिली चीनला टक्कर.
टिक टॉक अँप्स ला पर्याय म्हणून टिक टॅक ची केली निर्मिती.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
भारत-चीन या दोन्ही देशांमध्ये सीमेवर सुरू असलेल्या वादांमुळे भारत सरकारने चीनच्या ५९ ॲप्स वर बंदी घातली. या ५९ ॲप्समध्ये टिकटॉक या ॲपचा देखील समावेश होता. टिक टॉक च्या माध्यमातून स्वतःची व्हिडिओ बनवून अनेक नवख्या कलाकारांना प्रसिद्धी मिळाली होती.परंतू हे ॲप्स बंद झाल्याने या नवख्या कलाकारांमध्ये निराशा आली होती व तमाम टिक टॉक प्रेमींचा हिरमोड झाला होता.
अशातच या लॉकडाउन च्या काळात वर्क फ्रॉम होम च्या माध्यमातून काम करत असलेल्या इंदापूरच्या राहुल खोमणे या होतकरू तरुणाला कल्पना सुचली की का आपणच असेच ॲप्स तयार करू नये त्यावर त्याने विचार करून आपल्या सहकाऱ्यांना याची माहिती देऊन भारतीय बनावटीचे
ॲप्स तयार करण्याचा निर्धार केला.
इंदापूर मधील कुल्फी विक्रेता ते पुणे, बारामती येथील आय. टी कंपनीचा मालक अशी गरुडझेप घेतलेल्या राहुल खोमणे,त्याचे सहकारी रंजीत घाडगे, अक्षय गोरड, राहुल कदम यांनी चीनच्या बंदी घातलेल्या टिक टॉक ॲप्स ला पर्याय म्हणून टिक टॅक हे ॲप्स बनवले आहे. आबालवृद्ध नागरिकांचे मनोरंजन व कला सादरीकरण केंद्रबिंदू मानून हे ॲप्स मराठी, हिंदी व इंग्लिश या भाषेत तयार करण्यात आले असून अवघ्या काही दिवसातच हजारो नागरिक हे ॲप्स वापरू लागले असून 5 हजाराच्या पुढे व्हिडीओ अपलोड झाले आहेत.
राज्याचे सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ॲप्सचा शुभारंभ झाला. यावेळी राज्य मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, चीन ने भारताचे सैनिक कुटनितीने मारल्याने भारत सरकार ने चीनच्या ५९ ॲप्स वरतीबंदी घातली असून त्यामध्ये टिक टॉक चा देखील समावेश आहे. त्यामुळे राहुल व सहकाऱ्यांनी संधी ओळखून टिक टॉक ला पर्याय म्हणून टिक टॅक हे ॲप्स बनवले आहे. या ॲप्स मध्ये सर्व टिक टॉक सारखी फीचर्स असून हा ॲप्स राज्यातील पहिला ॲप्स असल्याचा राहुल यांचा दावा आहे. पॉप्युलर क्रियेटर साठी ब्ल्यू टिक सुद्धा या ॲप्स मध्ये असून हे ॲप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. राहुल व सहकाऱ्यांचे कार्य अनमोल असून या ॲप्सचा वापर जास्तीतजास्त लोकांनी करावा असे आवाहन त्यांनी केले.
हे ॲप्स बनवल्याने अनेक टेलिव्हिजन क्षेत्रातील कलाकारांनी राहुल खोमणे सह त्यांच्या टीमचे तोंडभरून कौतुक करून हे भारतीय बनावटीचे ॲप्स डाउनलोड करण्याची कलाकारांना विनंती केली आहे.