इंदापूर तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या कडून कोरोना लढ्यासाठी एक लाख एक हजाराचा निधी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व तहसीलदार मेटकरी यांच्याकडे सुपूर्द.
ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना काळात दिला मदतीचा हात.
इंदापूर तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या कडून कोरोना लढ्यासाठी एक लाख एक हजाराचा निधी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व तहसीलदार मेटकरी यांच्याकडे सुपूर्द.
ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना काळात दिला मदतीचा हात.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
संपूर्ण जगावर ओढवलेल्या कोरोना महामारीच्या काळात अनेक लोकांचे मृत्यू झाले. तर कित्येक लोकांचे व्यवसाय धंदे बंद पडले,काहींना तर आपली नोकरीही गमवावी लागली आणि अशाच परिस्थिती मध्ये बऱ्याच नागरिकांना उपासमारीची वेळ आली अशा गंभीर परिस्थिती मध्ये अनेक लोकांनी आपापल्या परीने मदत केली.
काहींनी अन्नधान्य वाटप करून कित्येक भुकेलेल्या पोटाला आधार देण्याचे काम केले तर काहींनी औषध गोळ्याचे वाटप करून मदत केली.
या दरम्यान देशातील अनेक दानशूर व्यक्तींनी प्रधानमंत्री सहाय्यता निधी मध्ये तर काहींनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कडे आर्थिक स्वरूपाची मदत केली.
परंतु इंदापूर तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या माध्यमातून या जेष्ठ नागरिकांनी आपले देशाप्रती असलेले प्रेम,देशातील असलेल्या नागरिकांप्रति आपुलकी दाखवून तब्बल एक लाख एक हजार रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे सुपूर्द केला.
ज्येष्ठ नागरिकांनी एकत्रित येऊन केलेल्या या मदतीची सर्वत्र चर्चा सुरू असून त्यांचे तोंड भरून कौतुक करण्यात येत आहे.तसेच राज्यमंत्री भरणे यांनी जेष्ठ नागरिकांना काळजी घेण्याच्या घराबाहेर न पडण्याच्या सूचना करून शासनाने घालून दिलेले नियम व अटी यांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
आम्ही देखील राज्य शासनास मदत करून खारीचा वाटा उचलण्याच्या भावनेतून ही देणगी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देत असल्याचे यावेळी संघटनेचे अध्यक्ष हनुमंतराव माने यांनी सांगितले. यावेळी इंदापूर तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीसाठी आलेल्या राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संघटनेच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.
यावेळी इंदापूर पेन्शनर्स संघटनेचे अध्यक्ष हनुमंतराव माने, मोहन राजाराम राऊत, भिमराव डोंगरे, कमलाकर काशीद, मनोहर मिसाळ, हनुमंत माने, सुभेदार धापटे, हरिभाऊ तरंगे, शंकर खरात, किसन खाडे आणि इतर सदस्य उपस्थित होते.