विविध गुन्ह्यात फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
बारामती- मागील वर्षभरापासून विविध गुन्ह्यात फरार असलेल्या काटक्या काँग्रेश्या भोसले (वय ४७) या आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. फलटण तालुक्यातील टाकळवाडे येथे सापळा रचून बारामती तालुका पोलिसांनी त्यास अटक करण्यात आली आहे.
आरोपीवर ३०७ सह विविध गुन्हे दाखल होते. वर्षभरापासून तो फरार होता. सदर कामगिरी गुन्हेशोध पथकाचे सपोनि योगेश लंगुटे,पोलीस नाईक सदाशिव बंडगर,पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव,विनोद लोखंडे,मंगेश कांबळे यांनी केली आहे.