इंदापूर

शहाजीनगर येथील निरा भिमा कारखान्याच्या रोलरचे पूजन.

मा.मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पूजन.

शहाजीनगर येथील निरा भिमा कारखान्याच्या रोलरचे पूजन.

मा.मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पूजन.

इंदापूर:प्रतिनिधी

शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी सन 2020-21 च्या 20 व्या गळीत हंगामासाठी कारखान्यामध्ये बसविण्यात येणा-या मिल रोलरचे पूजन कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंञी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आज गुरुवारी (दि.6) उत्साहात करण्यात आले.

नीरा भीमा कारखाना आगामी गळीत हंगामात सुमारे 7 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पुर्ण करणार आहे. त्या दृष्टीने नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. आगामी गळीत हंगामासाठी कारखान्यामधील मशिनरीची हंगाम पूर्व कामे वेगात सुरु असून, ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेचे नियोजन पूर्ण झालेले आहे, अशी माहीती कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, हरिदास घोगरे, दत्तू सवासे, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगिता पोळ, जबीन जामदार, कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील आदी उपस्थित होते. कारखान्याचा गळीत हंगाम दि.15 ऑक्टोबर पासून सुरू करण्याचे नियोजन आहे.

Related Articles

Back to top button