बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचे उत्कृष्ट तपासाबद्दल पदक जाहिर केले आहे.
या गुन्हयाप्रकरणी एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना भौतिक पुराव्यांच्या आधारे तपासाची साखळी जोड त्यांनी गुन्हेगारास शोधून काढले.

बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर गंगाखेड येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत असताना सोनपेठ तालुक्यातील शेळगाव गावातील एका पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करुन तिचा खून करुन मृतदेह विहीरीत टाकून देण्यात आला होता. त्याच काळात कोपर्डीची घटना घडली होती, त्या मुळे वातावरण संवेदनशील होते. या घटनेनंतर या परिसरातील जनतेचा आक्रोश होता. या संवेदनशील घटनेचा तपास शिरगावकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
या गुन्हयाप्रकरणी एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना भौतिक पुराव्यांच्या आधारे तपासाची साखळी जोड त्यांनी गुन्हेगारास शोधून काढले. या प्रकरणी त्यांनी न्यायालयात जे दोषारोपपत्र सादर केले, तसेच जे पुरावे गोळा केले होते, त्या आधारे तीन वर्षात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.