इंदापूर
मोहोळ चे आमदार यशवंत माने यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.
इंदापूर मध्ये मोठ्या आनंददायी वातावरणात स्वातंत्र्य दिन साजरा.

मोहोळ चे आमदार यशवंत माने यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.
इंदापूर मध्ये मोठ्या आनंददायी वातावरणात स्वातंत्र्य दिन साजरा.
इंदापूर:-प्रतिनिधी
मोहोळ तालुक्याचे विद्यमान आमदार व इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने यांच्या हस्ते आज दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर येथे ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न झाला.
दरवर्षी मोठया उत्साहात साजरा होत असलेला स्वातंत्र्य दिवस यंदा मात्र कोरोना महामारीमुळे काही बंधने असल्या कारणाने काही मोजक्याच व्यक्तींना एकत्र येऊन साजरा करावा लागत आहे.
या कार्यक्रमावेळी आमदार यशवंत माने यांनी उपस्थितांना 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर येथील कर्मचारी वर्ग उपस्थित होता.