माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचे विविध मागण्यांसाठी अमरण उपोषण.
कामगारांची प्रकृती बिघडली.
माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचे विविध मागण्यांसाठी अमरण उपोषण.
कामगारांची प्रकृती बिघडली.
बारामती वार्तापत्र
माळेगावा सहकारी साखर कारखाना या ठीकाणी आमरण उपोषणाला बसलेले दोन कामगार हे नाना आटोळे ,व गोविंद तावरे या कामगारांच्या काही मागण्यासाठी ते आमरण उपोषणाला बसले आहेत.
आज आमरण उपोषणाला 7 दिवस झाले तरी देखील माळेगाव कारखान्यातील प्रशासनाने दखल घेतली नसून आज त्या कामगारांची प्रकृती खुप गंभीर झालेली आहे, आज राष्ट्रीय समाज पक्ष बारामती तालुक्याच्या वतीने देखील त्यांना पाठींबा देण्यात आला असून अँड.अमोल सातकर यानी कारखान्याचे चेअरमन संचालक मंडळ व एम डी यांना इशारा दिला आहे. लवकरात लवकर याच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा रासप च्या वतीने तिव्र स्वरूपाचे अंदोलण केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे या वेळी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.