लहुजी शक्ती सेनेने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याच्या मागणी करिता प्रधानमंत्री कार्यालयाकडे पाठवली शेकडो पत्रे.
जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून केली मागणी.
लहुजी शक्ती सेनेने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याच्या मागणी करिता प्रधानमंत्री कार्यालयाकडे पाठवली शेकडो पत्रे.
जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून केली मागणी.
इंदापूर:-प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाने या थोर महापुरूषास भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी समाजातील विविध स्तरांतून होत आहे.या वर्षी 1 ऑगस्ट 2020 रोजी अण्णाभाऊंच्या जयंतीदिनी देशभरातून अनेकांनी अण्णा भाऊंना भारतरत्न मिळावा अशी मागणी केली होती.
दरम्यान दि.21 ऑगस्ट रोजी लहुजी शक्ती सेना इंदापूर शहर व तालुक्याच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा तसेच अनु.जाती मधील लोकसंख्येच्या पुराव्यांच्या आधारे अ. ब. क. ड, च्या वर्गीकरणानुसार मातंग समाजास स्वतंत्र आरक्षण मिळावे अशा आशयाची शेकडो पत्रे प्रधानमंत्री यांना पाठवून मागणी केली आहे.
यावेळी बोलताना प्रा.अशोक मखरे सर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे महाराष्ट्राच्या स्वातंत्र निर्मितीसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत समाज जागृतीच्या रूपाने खूप मोठे योगदान असून या प्रतिभावंत महापुरुषास जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून भारतरत्न घोषित करावा अशी मागणी केली.तसेच इंदापूर नगरपरिषदेचे नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी अण्णाभाऊ साठे यांना महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा असे संबोधले.
यावेळी नगरसेवक दादासाहेब सोनवणे,प्रा अशोक मखरे सर,लहुजी शक्ती सेनेचे शहर अध्यक्ष आकाश अडसूळ,उमेश ढावरे,विकास अडसूळ,सनी ढावरे,मयूर ढावरे,अशोक अडसूळ, राहुल कांबळे,नंदू खंडागळे,अमोल कांबळे,चंदू अडसूळ,सागर शिंदे, व समाजातील अन्य बांधव उपस्थित होते.