आज सकाळी बारामती मध्ये कोरोनाचे 30 रुग्ण आढळल्यानंतर संध्याकाळी पुन्हा 17 रुग्ण आढळले आहेत, तर अंबिका नगर येथिल एका सुप्रसिध्द जिम मालकाचे वडिल आज कोरोना ने मृत्युमुखी पडले.बारामतीतील मृत्युचा आकडा २६ वर.
बारामतीची रुग्ण संख्या 520 झाली आहे. व कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 255 झालेली आहे.

बारामती; वार्तापत्र
काल बारामती मध्ये 76 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते, त्यापैकी 63 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून शहरातील सहा व व तालुक्यातील सात असे तेरा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
बारामती मध्ये आज खाजगी प्रयोगशाळेमध्ये एकूण 23 नमुने एंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते, त्यापैकी बारामती शहरातील तीन व कटफळ येथील एक असे चार रुग्णांचा अहवाल एंटीजन पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे आज दिवसभरात एकूण सतरा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून बारामतीची रुग्ण संख्या 520 झाली आहे. व कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 255 झालेली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये मूर्टी येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 6 व माळेगाव बुद्रुक येथील 1 जण तसेच बारामती शहरातील जुना मोरगाव रोड येथील 2 रुग्ण, आमराई येथील 1 रुग्ण,तांदूळवाडी येथील 1 रुग्ण, इंदापूर येथील 1 रुग्ण ,अंबिका नगर येथील 1 रुग्ण, हरिकृपा नगर येथील 1 रुग्ण तसेच रिलायन्स टॉवर शेजारी ढोर गल्ली येथील 1 रुग्ण व शहरातील 1 रुग्ण असे रुग्ण आढळून आले आहेत.
अशी वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ मनोज खोमणे यांनी दिली.