वाकी तलावामध्ये सोडले पाणी मा.ना.अजितदादांनी पाळला “शब्द”
याबद्दल सर्वच परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून मा.ना.अजितदादा यांचे आभार मानले आहेत.

वाकी तलावामध्ये सोडले पाणी मा.ना.अजितदादांनी पाळला “शब्द”
याबद्दल सर्वच परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून मा.ना.अजितदादा यांचे आभार मानले आहेत.
बारामती:वार्तापत्र
बारामती तालुक्यातील वाकी गावामध्ये शेती सिंचनाची कोणतीही सोय नसल्यामुळे गपाणी सोडण्याची अनेक दिवसाची ग्रामस्थांची मागणी होती. विधानसभा निवडणुकीचे वेळी मा.ना.अजितदादा पवार यांनी वाकी तलावामध्ये कायमस्वरूपी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते. त्याचं अनुषंगाने सर्व बाबींची पूर्तता करून कालच तलावामध्ये पुरंदर उपसा सिंचन योजना अंतर्गत खडकवासला कालव्याचे ओव्हर फ्लो चे पाणी सोडण्यात आले.
या प्रसंगी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर, कार्यकारी अभियंता श्री.कानिटकर साहेब, दूध संघांचे चेअरमन श्री.संदीप जगताप, कार्यकारी अभियंता यांत्रिकी श्री.काजी साहेब, उपअभियंता श्री.भुजबळ साहेब, संचालक श्री.लालासाहेब नलवडे, उपसरपंच श्री.दादासाहेब जगताप, मा. सरपंच श्री.दादासाहेब कारंडे, व मूर्टी वाकी मोराळवाडी व कानाडवाडी येथील शेतकरी व प्रमुख उपस्थित होते. वाकी येथील लघु प्रकल्प पाटबंधारे तलाव असून त्याची क्षमता १०२ एम.सी.एफ. टी.या क्षमतेचा असून यातील पाण्याचा फायदा शेती व पिण्याच्या पाण्यासाठी होणार असून मुर्टी, वाकी, मोराळवाडी, कानाडवाडी, चोपडज व वडगाव निंबाळकर परिसरातील शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होणार असल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री मा.नाअजितदादा पवार सो। यांनी याबाबत आश्वासन दिल्याप्रमाणे सदरचे काम मार्गी लावले आहे. याबद्दल सर्वच परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून मा.ना.अजितदादा यांचे आभार मानले आहेत.
अशी माहिती तालुका अध्यक्ष श्री.संभाजी होळकर यांनी दिली.