बारामतीत कोरोना ने आज केला सहाशे चा आकडा पार.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 614 वर गेली आहे.

बारामतीत कोरोना ने आज केला सहाशे चा आकडा पार.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 614 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
बारामतीत आजदेखील कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा कायम राहिला आज दिवसभरात बारामतीत 32 कोरोना बाधित आढळले आहेत; तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने बारामतीतील कोरोना रुग्णांची बळीची संख्या देखील तीस वर पोचली आहे
काल बारामती मध्ये एकूण 82 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एकूण पंधरा जणांचा अहवाल प्रतीक्षेत असून 67 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. काल संध्याकाळनंतर व आज दिवसभरात बारामतीतील खाजगी प्रयोगशाळेमध्ये एकूण 98 नमुने एंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 74 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
यामध्ये बारामती शहरातील 18 व ग्रामीण भागातील 6 अशा 24 जणांचा अहवाल एंटीजेन पॉझिटिव्ह आलेला आहे. आज दिवसभरात ग्रामीण रुग्णालय रूई येथे शासकीय एंटीजेन तपासणीसाठी 41 जणांचे नमुने घेण्यात आले होते, त्यापैकी ग्रामीण भागातील 6 व बारामती शहरातील 2 अशा आठ जणांचा अहवाल एंटीजेन पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे चोवीस तासातील एकूण रुग्णसंख्या 32 झालेली आहे व बारामतीची एकूण रुग्ण संख्या 614 झालेली आहे.
काल रात्री अंजनगाव येथील एका रुग्णाचा उपचार सुरू असताना ग्रामीण रुग्णालय रूई येथे मृत्यू झालेला आहे त्यामुळे मृत्यूंची संख्या 30 झालेली आहे
अशी माहिती वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ.मनोज खोमणे यांनी दिली.