राज्यातील औद्योगिक वीज ग्राहकांना दिलासा! विद्युत शुल्कात दोन टक्क्यांची घट.
त्यामुळे सवाचार लाख ग्राहकांना याचा फायदा होणार असून महिन्याला 60 कोटी रुपयांचा लाभ होऊ शकणार आहे.
राज्यातील औद्योगिक वीज ग्राहकांना दिलासा! विद्युत शुल्कात दोन टक्क्यांची घट.
त्यामुळे सवाचार लाख ग्राहकांना याचा फायदा होणार असून महिन्याला 60 कोटी रुपयांचा लाभ होऊ शकणार आहे.
लॉकडाऊनमुळे आर्थिक चणचणीचा सामना करणाऱ्या औद्योगिक वीज ग्राहकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आतापर्यंत औद्योगिक ग्राहकांना त्यांच्या वीज बिलावर 9.30 टक्के एवढे विद्युत शुल्क सरकारकडून आकारले जात होते. त्यामध्ये 1.80 टक्के एवढी कपात केली आहे. त्यामुळे सवाचार लाख ग्राहकांना याचा फायदा होणार असून महिन्याला 60 कोटी रुपयांचा लाभ होऊ शकणार आहे.
राज्यात सुमारे चार लाख लघुदाब औद्योगिक वीज ग्राहक असून 20 हजार उच्च दाब वीज ग्राहक आहेत. त्यांनी कापरलेल्या वीज बिलावर राज्य सरकारकडून 9.30 टक्के एवढे विद्युत शुल्क लावले जाते. मात्र सध्या असलेल्या कोरोना संकटामुळे सर्कच आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी विद्युत शुल्कात 1.80 टक्क्यांची कपात करून 7.50 टक्क्यांपर्यंत खाली आणले आहे. औद्योगिक ग्राहकांचे वर्षाला सुमारे 45 हजार कोटी रुपयांचे बिलिंग होत आहे. त्यामुळे सरकारने विद्युत शुल्कात कपात केल्याने वर्षाला जवळपास 720 कोटी रुपयांचा लाभ मिळू शकणार आहे.