बारामती प्रशासनाच्या व नेत्यांच्या निर्णयावर व्यापारी वर्ग नाखुष.
बारामतीतील 14 दिवस जनता कर्फ्यूचा निर्णय व्यापाऱ्यांना विश्वासात न घेताच घेतल्याचा आरोप.
बारामती प्रशासनाच्या व नेत्यांच्या निर्णयावर व्यापारी वर्ग नाखुष.
बारामतीतील 14 दिवस जनता कर्फ्यूचा निर्णय व्यापाऱ्यांना विश्वासात न घेताच घेतल्याचा आरोप
बारामती वार्तापत्र
वाचा सविस्तर बातमी व पहा व्हिडिओ.????????
आज येथील शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी, स्वप्नील मुथा, सुशील सोमाणी, महेश ओसवाल, नरेंद्र मोता, शैलेश साळुंखे, प्रमोद खटावकर, किरण गांधी, प्रवीण अहुजा आदींनी पत्रकारांशी बोलताना या निर्णयासंदर्भात आपली नाराजी व्यक्त केली.
गुजराथी म्हणाले, बारामती औद्योगिक वसाहतीला वेगळी आहे व बारामती शहरातील दुकानदारांसाठी वेगळा न्याय अशी भूमिका का प्र मागील वेळेस बारामती शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने लोक डाऊन मध्ये आपली दुकाने बंद ठेवली मात्र सातत्याने दुकाने बंद ठेवली जात आहेत वयामध्ये व्यापारी व कामगार भरडले जात आहेत जरी बाजारपेठा सुरू असल्या तरी पूर्वीपेक्षा व्यवहार मात्र निम्म्याने कमी आहेत. बारामती चा व्यवहार पाच तालुक्याशी संलग्न असल्याने फक्त बारामती बंद ठेवल्याने फारसा फरक पडणार नाही, आसपासचे पाच तालुके बंद ठेवल्यानंतर लॉकडाऊन चा उपयोग होईल असे वाटते, मात्र छोटे दुकानदार दुकाने सुरू होणार व व्यावसायिकांना मात्र मोठा फटका बसणार आहे. उद्या आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही या संदर्भात भेटणार आहोत.
सुशील सोमाणी म्हणाले, दुकाने बंद राहिल्याने कामगारांना मोठा फटका बसणार आहे. त्याचबरोबर व्यवहार होत नसल्याने व्यावसायिकांनाही मोठा आर्थिक फटका बसत आहे. दहा दहा वर्ष दुकानात काम केल्यामुळे कामगारांना पगारा वाचून वंचित ठेवणे चुकीचे होत आहे. दुसरीकडे कुठल्याही प्रकारचे दैनंदिन व्यवहार नीट होत नसल्याने व्यावसायिक आर्थिक गर्तेत आले आहेत. प्रत्येक वेळी बंद चालू च्या धरसोड धोरणामुळे दुकानदारांना व्यापाऱ्यांना मोठा फटका बसत आहे याचा विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे.
स्वप्नील मुथा म्हणाले, या निर्णयामध्ये व्यापाऱ्यांना विश्वासात घेतले असते तर बरे झाले असते. बारामती मध्ये कोरोनाचा प्रसार पूर्ण नियंत्रणात आला पाहिजे याबाबत कोणाचेही दुमत नाही. प्रत्येक वेळी व्यापारी व्यावसायिकांनी यात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतलेला आहे. मात्र प्रत्येक वेळी व्यापारी व व्यावसायिकांना त्यामध्ये भरडणे योग्य नाही असे वाटते.