आश्रमशाळा संस्थाचालक व कर्मचाऱ्यांचे इंदापूर तहसील कचेरी समोर बेमुदत धरणे आंदोलन.
विविध मागण्यांसाठी आंदोलन.
आश्रमशाळा संस्थाचालक व कर्मचाऱ्यांचे इंदापूर तहसील कचेरी समोर बेमुदत धरणे आंदोलन.
विविध मागण्यांसाठी आंदोलन.
इंदापूर:-प्रतिनिधी
दि.५ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी १०:३० वा.शिक्षकदिनी इंदापूर तहसील कचेरी समोर आश्रमशाळा संदर्भातील विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात झाली.बेमुदत धरणे आंदोलन इंदापूरचे माजी नगराध्यक्ष तथा मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या नेतृत्वात सुरू झाले असून सदर आंदोलनात संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.निवेदनात मागणी केलेल्या सर्व मागण्या मंजूर झाल्याशिवाय बेमुदत धरणे आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे आंदोलनकर्ते मखरे यांनी सांगितले.कोरोना संदर्भातील शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून आंदोलन सुरू करण्यात आले.
आश्रमशाळेकडील विद्यार्थ्यांचे गतवर्षीचे परीपोषण आहाराचे अनुदान त्वरित द्या.आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविणे.इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे. पी.गुप्ता यांचेवरती कारवाई झाली पाहिजे.या व निवेदनात दिलेल्या इतर मागण्या मंजूर होईपर्यंत सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्ते मखरे यांनी शेवटी वार्तालाप करताना सांगितले.