पुणे – जम्बो कोविड केअर हॉस्पिटलमधील सुमारे 25 डॉक्टरांनी शनिवारी राजीनामे दिले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील हॉस्पिटलच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली होती.
पुणे – जम्बो कोविड केअर हॉस्पिटलमधील सुमारे 25 डॉक्टरांनी शनिवारी राजीनामे दिले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील हॉस्पिटलच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली होती.
मात्र, महापालिकेने शुक्रवारीच डॉक्टर आणि नर्सची कुमक या ठिकाणी पाठवून उपचाराची सोय केल्याने, रुग्णांबाबत हलगर्जीपणा होणार नाही हे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
जम्बो कोविड हॉस्पिटलविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील हॉस्पिटलच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली होती. पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच आता नागरिकांना धीर देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन त्यांनी केले होते. महापालिकेने 50 डॉक्टर्स आणि 150 वैद्यकीय मनुष्यबळ तातडीने पुरवून या हॉस्पिटलची घडी बसवण्याचा प्रयत्न केला आहे.
या रुग्णालयातील प्रश्न सोडवण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ देण्यात आले आहे. याशिवाय पहिल्या दिवसापासूनच औषधांचा पुरवठाही सुरळीत केला आहे. त्यामुळे रुग्णाला उपचार घेण्यात येथे काही अडचण येणार नाही. याशिवाय डॉक्टरांच्या राजीनाम्याचा विषयी माहिती घ्यावी लागेल. कारण संबंधित एजन्सीने त्यांची नेमणूक केली होती. मात्र, आता महापालिकेने तेथे मनुष्यबळ पुरवले आहे.
– रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, मनपा