उद्यापासुन सुरु होणाऱ्या जनता कर्फ्यु ची नियमावली जाहीर… वाचा काय चालू काय बंद रहाणार.
रात्री बारा वाजेपर्यंत लोक डाऊन संदर्भातील नियम प्रांताधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.

उद्यापासुन सुरु होणाऱ्या जनता कर्फ्यु ची नियमावली जाहीर… वाचा काय चालू काय बंद रहाणार.
रात्री बारा वाजेपर्यंत लोक डाऊन संदर्भातील नियम प्रांताधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.
बारामती : वार्तापत्र
बारामती शहरात सोमवारी (ता.7) पहाटे एक वाजल्यापासून ते 20 सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत लोक डाऊन संदर्भातील नियम प्रांताधिकाऱ्यांनी जाहीर केले आहेत, अर्थात 13 सप्टेंबर 2020 रोजी कोरोना चा संसर्ग कमी झालेला आहे किंवा कमी होतो आहे या संदर्भातील आढावा घेऊन पुढेही ते नियमित लागू करण्यासंदर्भात नव्याने आदेश दिले जाणार आहेत.
बारामती मधील लॉकडाउनच्या नियम व त्यांची माहिती प्रांताधिकाऱ्यांनी दिलेली आहे.
यामध्ये जे प्रतिबंधित क्षेत्र असतील, ते क्षेत्र जवळपास बारामती शहराचा संपूर्ण परिसरामध्ये येत असून यामध्ये 65 वर्षावरील सर्व व्यक्ती अति जोखमीची आजार असलेले (ज्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा यकृत व मूत्रपिंडाचा विकार, कर्करोग) रुग्ण अशा व्यक्ती तसेच गरोदर महिला व वय वर्ष दहापेक्षा कमी वयातली मुले यांना अत्यावश्यक सेवा वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर जाता येणार नाही,
इतर कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.
अत्यावश्यक सेवेशिवाय इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील. झोमॅटो, स्विगी, डॉमिनोज व तशा प्रकारचे ऑनलाइन पोर्टल वरून मागवले जाणारे खाद्यपदार्थ पुरसेवा संपूर्ण बंद राहणार आहेत.
सर्व केस कर्तनालय, सलून, ब्युटीपार्लर ही दुकाने बंद राहतील. उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल, रिसॉर्ट, मॉल, बाजार मार्केट, संपूर्णतः बंद राहतील.
सार्वजनिक व खाजगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे सर्व बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी सकाळचा व्यायाम व संध्याकाळचा चालण्याचा व्यायाम पूर्णतः मनाई राहील.
सर्व किरकोळ व ठोक विक्रीची ठिकाणे, भाजीमार्केट, फळविक्रेते ,आठवडे व दैनिक बाजार फेरीवाले व कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहील.
मटन,चिकन, अंडी, मासे इत्यादींची विक्री बंद राहील.
शाळा, महाविद्यालय, शिक्षण संस्था, प्रशिक्षण संस्था व सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहतील.
सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहने, दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी वाहने पूर्णतः बंद राहतील, अर्थात अत्यावश्यक सेवेतील वाहने परवानगी असलेली वाहने, वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनांचा होणारा वापर याला परवानगी असेल.
प्रतिबंधित नगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक व खासगी बससेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर इत्यादीसाठी पूर्णतः बंद राहतील, फक्त कोरोनाविषाणू प्रतिबंधात्मक योजना करणारे पोलिस विभागाचे नगरपरिषद क्षेत्रातील व केंद्रीय विभागाचे कर्मचारी व त्यांची वाहने यांना या आदेशातून वगळण्यात येत आहे.
बारामती नगर परिषदेच्या हद्दीतील व हद्दीलगत असणाऱ्या एमआयडीसी परिसरातील अत्यावश्यक सेवेमधील मेडिकल व दवाखाने वगळून इतर सर्व प्रकारची दुकाने शॉपिंग मॉल्स व तत्सम गर्दी होणारी सर्व ठिकाणी संपूर्णतः बंद राहतील.
सुरू काय राहणार आहे..!!
दूध विक्री व घरपोच दुधाचे वितरण संपूर्ण कालावधीत सात दिवसात सुरू राहील.
सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा पशुचिकित्सा सेवा यांचे काम नियमित वेळेनुसार सुरू राहील. सर्व रुग्णालय व रुग्णालयाची निगडीत सर्व सेवा यांचे काम नियमानुसार व वेळेनुसार सुरू राहील. कोणतेही रुग्णालय प्रतिबंधित क्षेत्राच्या आदेशाचा आधार घेऊन रुग्णांना अत्यावश्यक सेवा नाकारणार नाही, अन्यथा संबंधित रूग्णसेवा संस्था कारवाईस पात्र राहील.