इंदापूर

स्पर्धार्थी युवकांसाठी अविनाश शिंदे एक आदर्श-हर्षवर्धन पाटील.

तोंड भरून केले कौतुक.

स्पर्धार्थी युवकांसाठी अविनाश शिंदे एक आदर्श-हर्षवर्धन पाटील.

तोंड भरून केले कौतुक.

इंदापूर : प्रतिनिधी
शेतकरी कुटुंबातील अविनाश शिंदे हा युवक जिद्द व चिकाटीच्या जोरावर देशातील सर्वोच्च परीक्षेमध्ये यश मिळवून जिल्हाधिकारी झाला आहे, याचा इंदापूर तालुक्यातील जनतेला अभिमान आहे.तसेच स्पर्धार्थी युवकांसाठी अविनाश शिंदे यांनी आदर्श घालून दिला आहे,असे गौरवोद्गार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (युपीएससी) सन 2019 मध्ये झालेल्या स्पर्धा परीक्षेतून जिल्हाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल अविनाश संजीवन शिंदे (पवारवाडी) यांचा हर्षवर्धन पाटील इंदापूर येथे गुरुवारी (दि.3) सत्कार करण्यात आला.

प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अविनाश शिंदे यांनी हे यश संपादन केले आहे.त्यांनी तालुक्यातील युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करावे,असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.अविनाश शिंदे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. या सत्कार प्रसंगी संजीवन शिंदे, राजेंद्र शिंदे,शांताराम वाकळे, शितल शिंदे, बाळासाहेब मोरे, शिवाजी मोरे, गणेश घोरपडे, सुनील कणसे आदी उपस्थित होते.

युपीएससी स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या देशातील जिल्हाधिकार्‍यांना मसूरी-डेहराडून (उत्तराखंड) येथे प्रशिक्षण दिले जाते. राज्याचा मी संसदीय कार्यमंत्री असताना माझा उत्कृष्ट संसदीय कार्यमंत्री म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यावर्षी मसुरी येथे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकार्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी माझे व्याख्यान ठेवण्यात आले होते. सदरच्या व्याख्यानाला प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकाऱ्यांचा उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्याची आठवण या सत्कार प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!