बारामती कोरोना रोखण्यासाठी हे बदल महत्त्वाचे..
बारामतीत ४१ दवाखाने अधिग्रहीत केले आहेत.
बारामती कोरोना रोखण्यासाठी हे बदल महत्त्वाचे..
बारामतीत ४१ दवाखाने अधिग्रहीत केले आहेत.
बारामती वार्तापत्र
बारामतीत दररोज १०० हून अधिक रुग्ण आढळू लागले आहेत. वेगवेगळ्या खासगी प्रयोगशाळाही आता कोरोनाच्या रॅपीड चाचण्या करू लागल्या आहेत. त्यामुळे साहजिकच आजपासून येणाऱ्या काही दिवसांपर्यंत हे रुग्ण नक्कीच वाढणार आहेत, अशा स्थितीत शासकीय यंत्रणेवरील ताण वाढला आहे, मात्र तरीदेखील आरोग्य यंत्रणेने काही तातडीचे बदल करण्याची गरज असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
कोरोनाबाधित आढळून येणाऱ्या विनालक्षणाच्या रुग्णांना होम आयसोलेशन करण्यापेक्षा त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्याची गरज आहे; होम आयसोलेशनचे गणित खूपजण पाळत नाहीत, त्यामुळे पुढील काही दिवसांत त्यांच्या कुटुंबातील लोक कोरोनाबाधित होऊन पुढे येत आहेत, त्यामुळे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनचीच प्रक्रिया करण्याची गरज आहे. अर्थात रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता विनालक्षणांसाठी प्रशासकीय यंत्रणेने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
कोविड व नॉन कोविड दवाखाने वेगळे करावेत
बारामतीत ४१ दवाखाने अधिग्रहीत केले आहेत. मात्र सर्व दवाखाने अजून कोविड नाहीत. सध्या अगदी दोन ते तीन दवाखाने नॉन कोविड ठेवून उर्वरित सर्व दवाखाने १०० टक्के कोविड करावेत. नॉन कोविड दवाखाना बारामतीत असण्याची गरज आहे.
अशावेळी नेहमीच्या इतर आजाराच्या सामान्य रुग्णांकरीता दररोजच्या ओपीडीसाठी शहरातील एखादा मोठा हॉल अधिग्रहीत करून तेथे शहरातील खासगी दवाखान्यांमधील दररोज दोन फिजीशीयन व दोन ज्युनिअर डॉक्टरांच्या नेमणूका कराव्यात, जेणेकरून प्रत्येक दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी होऊन क्रॉस इन्फेक्शनची भीती आहे, ती देखील दूर करता येईल.