कंगना म्हणतेय, “सोनियाजी, तुम्ही गप्प का?”
आपले स्वत:चे सरकार महिलांना त्रास देत होते आणि कायदा आणि सुव्यवस्थेची संपूर्णत:
कंगना म्हणतेय, “सोनियाजी, तुम्ही गप्प का?”
आपले स्वत:चे सरकार महिलांना त्रास देत होते आणि कायदा आणि सुव्यवस्थेची संपूर्णत:
मुंबई : बारामती वार्तापत्र
आदरणीय सोनिया गांधीजी, तुमच्या महाराष्ट्रातील सरकारकडून मला जी वागणूक दिली जात आहे. ते पाहून एक स्त्री म्हणून तुम्हाला यातना होत नाहीत का? असा सवाल करत अभिनेत्री कंगना राणावतने आता आपला मोर्चा कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे वळवला आहे. महाराष्ट्रात तुमचे सरकार आहे. तुम्ही देखील एक स्त्री आहात. जी वागणूक मला सध्या महाराष्ट्र सरकारकडून मिळत आहे, ती पाहून एक स्त्री म्हणून तुमच्या मनाला यातना होत नाहीत का? आणि आपण डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील तत्वांचे पालन करण्यास आपल्या सरकारला सांगू शकत नाही का? असे प्रश्न तिने आपल्या ट्विटमधून उपस्थितीत केले आहेत.
कंगनाने दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिलंय की, “आपण देखील पाश्चिमात्त्य देशात जन्मलात-वाढलात आणि मग भारतात येवून स्थायिक झालात.
महिलेच्या वाट्याला येणाऱ्या संघर्षाबद्दल आपण जाणून असालच. जेव्हा आपले स्वत:चे सरकार महिलांना त्रास देत होते आणि कायदा आणि सुव्यवस्थेची संपूर्णत: खिल्ली उडवत होते तेव्हा तुम्ही गप्प राहिलात याची दखल इतिहास जरुर घेईल. मी आशा करते की आपण आपले घडी घातलेले हात सोडाल आणि याबाबत काही हस्तक्षेप कराल…”
गेल्या काही दिवसांपासून कंगना राणावत ही मुंबईविषयी केलेल्या वक्तव्यावरुन चर्चेत आहे. कंगनाने मुंबईतील परिस्थिती ही पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे झाली असल्याचं म्हटलं होतं. त्यावर बरीच टीका झाली होती. त्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर कंगनाला हिमाचल प्रदेशमधून मुंबईत पुन्हा येऊ नको, अशा धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप तिने केला होता. या धमक्यांना न घाबरता ती 9 तारखेला मुंबईत दाखल झाली.
ती मुंबईत येण्यापूर्वी मुंबई महानगर पालिकेने तिचे कार्यालय अनाधिकृत असल्याचे सांगत त्यावर कारवाई केली. ही कारवाई सुडबुद्धीने केली असल्याचा आरोप कंगनाने केला होता. या कारवाईने चिडलेल्या कंगनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करुन त्यांना थेट आव्हान देणाराच व्हिडिओ जाहिर केला होता. काल रिपाईचे रामदास आठवले यांनी कंगना राणावतच्या घरी जाऊन तिला आपले समर्थन जाहीर केले होते. त्यानंतर आता कंगनाने थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर प्रश्न उपस्थितीत केले आहेत. कंगनाच्या वक्तव्यांना प्रतिउत्तर देत शिवसेना अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. तिच्या वक्तव्यांना महत्त्व.