अर्धवट राहिलेली आष्टी उपसा सिंचन व शिरापुर उपसा सिंचन योजना लवकरात लवकर कार्यान्वित करा.
आमदार यशवंत माने यांच्या अधिकाऱ्यांना सुचना
अर्धवट राहिलेली आष्टी उपसा सिंचन व शिरापुर उपसा सिंचन योजना लवकरात लवकर कार्यान्वित करा.
आमदार यशवंत माने यांच्या अधिकाऱ्यांना सुचना.
बारामती वार्तापत्र
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील शेती चा कायमस्वरूपी पाणी प्रश्न मार्गी लागून शेत शिवारासाठी वरदान ठरणारी परंतु अर्धवट राहिलेली आष्टी उपसा सिंचन व शिरापुर उपसा सिंचन योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कामाला लागा अशा सूचना मोहोळ चे आमदार यशवंत माने यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
शुक्रवार दि.११ रोजी मोहोळ येथे आष्टी उपसा सिंचन व शिरापुर उपसा सिंचन योजना संदर्भात अधिकारी वर्गाची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्या बैठकीत आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेऊन उर्वरित कामासंदर्भात माहिती घेऊन लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याच्या सुचना केल्या.यावेळी आ. यशवंत माने बोलत होते.
यावेळी अधीक्षक अभियंता जयंत शिंदे,कार्यकारी अभियंता नारायण जोशी,रमेश वाडकर सहाय्यक कार्यकारी अभियंता श्रीकृष्ण गुंजाळ, उपविभागीय अभियंता बाळासाहेब जाधव,तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे,प्रल्हाद काशीद,उपसभापती जितेंद्र शीलवंत,भाऊसाहेब लांबकाने,मनोज साठे सह इतर उपस्थित होते.