भरत शहा मित्रपरिवार आणि महात्मा फुले ग्रुपच्या वतीने कोविड योद्ध्यांचा सन्मान.
कर्तव्याची दखल घेऊन सन्मान करण्यात आला.
भरत शहा मित्रपरिवार आणि महात्मा फुले ग्रुपच्या वतीने कोविड योद्ध्यांचा सन्मान.
कर्तव्याची दखल घेऊन सन्मान करण्यात आला.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
इंदापूर येथील स्मशानभूमीमध्ये भरत शहा मित्रपरिवार आणि महात्मा फुले ग्रुपच्या वतीने इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, आरोग्य निरीक्षक मनोज बारटक्के व आरोग्य विभागातील कर्मचारी यांचा कोविड योद्धा सन्मानपत्र, गुलाब पुष्प व वाफेचे मशीन देऊन सन्मान करण्यात आला. तसेच कोरोना व्हायरसमुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांचा अंत्यविधी करण्याचे काम करणाऱ्या आरोग्य विभागातील योद्ध्यांचा प्रवेश द्वारा पासून संपूर्ण रस्त्यावर फुलांच्या पाकळ्यांचा सडा मारुन त्यांचे आगमनाच्या वेळेस त्यांच्यावर पुष्पांचा वर्षाव करण्यात येऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
आपल्या जीवाची पर्वा न करता आपली जबाबदारी, माणुसकी म्हणून रात्री-अपरात्री हे कर्तव्य त्यांच्या हातून घडत आहे.
त्याबद्दल त्यांच्या कर्तव्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल आणि नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरोग्य विभागातील कर्मचारी कार्यशीलपणे आपले कर्तव्य बजावत आहेत.
इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा आणि महात्मा फुले ग्रुपचे अध्यक्ष पोपट शिंदे तसेच जावेद शेख,सामाजिक कार्यकर्ते रमेश आबा शिंदे,सकाळचे पत्रकार डॉ. संदेश शहा, दैनिक केसरीचे पत्रकार सुरेश जकाते, ॲड. विलास बाब्रस, मयूर गुजर, बोरा शेठ, नगरपालिका आस्थापना प्रमुख गजानन पुंडे, अल्ताप पठाण, अशोक चिंचकर ,अंबादास नाळे, धनाजी भोंग यांच्या हस्ते या कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.
सामाजिक बांधिलकी जपत भरत शहा मित्रपरिवार आणि महात्मा फुले ग्रुप अनेक उपक्रम राबवित असते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश शिंदे यांनी केले. आभार नगरपालिका आस्थापना प्रमुख गजानन पुंडे यांनी मानले.