इंदापूर तालुक्यात आज ५६ जण कोरोनाबाधित.
बारामतीत खासगी प्रयोगशाळेतही १२ जणांमध्ये ७ जण कोरोनाबाधित आढळले आहेत.
इंदापूर तालुक्यात आज ५६ जण कोरोनाबाधित.
बारामतीत खासगी प्रयोगशाळेतही १२ जणांमध्ये ७ जण कोरोनाबाधित आढळले आहेत.
बारामती वार्तापत्र ,इंदापूर
आज इंदापूर तालुक्यात तपासलेल्या ८५ संशयित कोरोना नमुन्यांमध्ये तब्बल ४९ जण कोरोनाग्रस्त आढळले, तपासलेल्या नमुन्यांमधील हे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे. तर बारामतीत खासगी प्रयोगशाळेतही १२ जणांमध्ये ७ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे आज दिवसभरात इंदापूर तालुक्यात ५६ जण कोरोनाबाधित आढळले आहेत.
आज आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सणसर येथील ओढ्याकाठच्या भागातील ३१ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे. बोरी येथील ६० वर्षीय महिला, बेलवाडी येथील ६० वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय पुरूष, कुंभारगाव येथील २४ वर्षीय पुरूष, जंक्शन येथील ४७ वर्षीय पुरूष, बंडगरवस्ती, पोंदवडी येथील ३३ वर्षीय पुरूष, ७ वर्षीय मुलगा, ३५ वर्षीय पुरूष, ७ वर्षीय मुलाचा समावेश आहे.
हिंगणगाव येथील २८ वर्षीय पुरूष, ६० वर्षीय महिला, भिगवण येथील ४० वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय महिला, नरुटवाडी येथील ६१ वर्षीय पुरूष, निमगाव केतकी येथील ४९ वर्षीय पुरूष, ३३वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय पुरूष, १९ वर्षीय मुलाचा यामध्ये समावेश आहे.
मदनवाडी येथील ४० वर्षीय महिला, लुमेवाडी येथील ६२ वर्षीय पुरूष, ५८ वर्षीय पुरूष, लासुर्णे येथील ७ वर्षीय मुलगा, ४० वर्षीय पुरूष, ७५ वर्षीय महिला, ६५ वर्षीय महिला, १५ वर्षीय मुलगा, १४ वर्षीय मुलगा, २९ वर्षीय पुरूष, ४० वर्षीय महिला, १९ वर्षीय युवक, ३२ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
लाखेवाडी येथील २० वर्षीय युवती, ७० वर्षीय महिला, १० वर्षीय मुलगा, इंदापूर येथील आंबेडकर नगर येथील २५ वर्षीय युवकाचा समावेश आहे. कळस येथील ५६ वर्षीय पुरूष, भादलवाडी येथील ६० वर्षीय पुरूष, ५० वर्षीय महिला, २२ वर्षीय युवती, २१ वर्षीय युवकाचा समावेश आहे.
पळसदेव येथील २५ वर्षीय युवक, लोणीदेवकर येथील ६९ वर्षीय पुरूष, निमगाव केतकी येथील १९ वर्षीय युवक, डाळज नंबर १ येथील ६५ वर्षीय पुरूष, ४० वर्षीय पुरूष, ३२ वर्षीय महिला, ११ वर्षीय मुलगी, ३८ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील खासगी प्रयोगशाळेत तपासलेल्या १२ नमुन्यांमध्ये ७ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये लोणीदेवकर येथील ४० वर्षीय पुरूष, भिमानगर, रांझणी येथील ४३ वर्षीय पुरूष, तरंगवाडी येथील २१ वर्षीय युवक, शेटफळ हवेली येथील ४० वर्षीय पुरूष, माळवाडी येथील ४ वर्षीय मुलगा, निमगाव केतकी येथील ५१ वर्षीय महिला, वरकुटे बुद्रुक येथील ४५ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.