व्यापारी महासंघानंतर गाळेधारक संघटना नाराज…
हा निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घेतले नाही.
बारामती वार्तापत्र
बारामतीतील प्रशासनाने जनता कयूं आणखी सात दिवसांनी वाढविल्याने गाळेधारक संघटनेने नाराजी व्यक्त केली. हा निर्णय घेताना
आम्हाला विश्वासात घेतले नाही, असा आरोप संघटनेने केला आहे. नुकसान टाळण्यासाठी गाळा भाडे माफ करावे, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र जाधव यांनी केली आहे. २० मार्चपासूनलॉकडाऊनमुळे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. जूनपासून अर्धवेळ व्यवसाय सुरू होते. मात्र अपेक्षित व्यवसाय झाला नाही. त्यामुळे गाळेधारक संघटनेने गाळा भाडे माफ करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. पवार यांनी हा विषय पालिकेचा असल्याचे सांगितले. परंतु पालिका कोणताही निर्णय घेत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. आता पंधरा दिवसांच्या जनता कयूंमुळे व्यवसाय बंद आहेत. या कालावधीत वीजबिल व अन्य खर्च सुरूच आहेत. त्यामुळे पालिकेने सुरुवातीच्या तीन महिन्यांचे भाडे माफ करावे. जूनपासूनच्या भाड्यामध्ये ५० टक्के सवलत
द्यावी, अशी संघटनेची मागणी आहे. येत्या शनिवारी याप्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संघटनेकडून भेट घेऊ, असे जाधव म्हणाले.
पालिका सुविधाच देत नाही
शहरात पालिकेच्या मालकीच्या गाळ्यांची संख्या मोठी आहे. जागाभाडे व घरपट्टी वसूल करणारी बारामती नगरपालिका येथे कोणत्याही सुविधा देत नाही. विजेची सोय नाही, अनेक गाळे गळतात.स्वच्छतेसाठी पालिका काहीही करीत नाही.स्वच्छतागृहांची काही ठिकाणी सोय नाही.ही परिस्थिती उपमुख्यमंत्री पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले