कोरोंना विशेष

गरिबाला जीव नसतो का? जगातील १३ टक्के लोकसंख्येसाठी ५० टक्के लस खरेदी.

करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गरिबाला जीव नसतो का? जगातील १३ टक्के लोकसंख्येसाठी ५० टक्के लस खरेदी.

करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

सध्या अंतिम टप्प्यात चाचणी असलेल्या लशींची आगाऊ नोंदणी करण्यात आली असून श्रीमंत देशांनी गरजेपेक्षा मोठी मागणी नोंदवली असल्याचे समोर आले आहे.

वॉशिंग्टन: जगभरातील मूठभरांच्या हाती बहुसंख्य लोकांची संपत्ती एकटवली जात असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जगातील फक्त १३ टक्के लोकसंख्या असणाऱ्या श्रीमंत देशांच्या गटांनी भविष्यात उत्पादीत होणाऱ्या करोनाच्या लशीच्या उत्पादनापैकी ५० टक्क्याहून अधिक वाटा खरेदी केला आहे. ऑक्सफॅमच्या एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.

एनालिटिक्स कंपनी एअरफिनिटी द्वारे जमा करण्यात आलेल्या आकडेवारीच्या आधारे एका स्वयंसेवी संस्थेने हा दावा केला आहे. सध्या सुरू असलेल्या अंतिम टप्प्यातील लस चाचणी करत असलेल्या पाच कंपन्या, फार्मास्युटिकल्स आणि लस खरेदीदार असणाऱ्या देशांच्या दरम्यान झालेल्या कराराचे, व्यवहाराचे विश्लेषण करण्यात आले आहे.

वाचा: संकट काळातील मित्र! रशियाकडून भारताला मिळणार लशीचे ‘इतके’ डोस
या अहवालाबाबत बोलताना ऑक्सफॅम अमेरिकेचे रॉबर्ट सिल्वरमॅन यांनी सांगितले की, प्राण वाचवणाऱ्या लशीचे वितरण, खरेदी तुमच्याकडे किती पैसा आहे, यावर अवलंबून असता कामा नये. एक सुरक्षित आणि प्रभावी लस तयार होणे ही काळाची गरज आहे. मात्र, त्याहून अधिक महत्त्वाची बाब म्हणजे ही लस सर्वांना उपलब्ध झाली पाहिजे. करोनाचा संसर्ग फक्त एकाच ठिकाणी नसून संपूर्ण जगभरात फैलावला असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा: अमेरिकेतही लवकरच करोनावर लस? ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
वाचा: रशिया, चीननंतर ‘या’ देशाने दिली लस वापराला मंजुरी

एस्ट्राजेनका, गामालेया (स्पुटनिक), मॉडर्ना, फायजर आमि सिनोवॅक या लशींच्या व्यवहारांचे विश्लेषण करण्यात आले आहे. ऑक्सफॅमने या पाचही कंपन्यांची उत्पादन क्षमता ५.९ अब्ज डोस इतकी मोजली आहे. एवढे डोस हे तीन अब्ज लोकांसाठी पुरेसे आहेत. लस पुरवठा कंपन्यांनी ५.३ अब्ज लशींच्या डोसचा खरेदी-विक्री करार केला आहे. यातील २.७ अब्ज (जवळपास ५१ टक्के) लशीचे डोस फक्त काही मूठभर विकसित आणि श्रीमंत देशांनी खरेदी केले आहेत. या देशांमध्ये जगातील फक्त १३ टक्के लोकसंख्या वास्तव्यास आहे. या देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, युरोपीयन महासंघ, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, स्विर्त्झलंड, जपान आदी देशांचा समावेश आहे.

वाचा: करोना मानवनिर्मित असल्याचे पुरावे सादर, पण…

दरम्यान, रशिया आणि चीननंतर आता संयुक्त अरब अमिरातीनेही लस वापराला मंजुरी दिली आहे. आपात्कालीन परिस्थितीत लस वापरता येणार आहे. करोना लशीची मानवी सुरू झाल्यानंतरच्या सहा आठवड्यांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. चीनच्या सिनोफार्म कंपनीने ही लस विकसित केली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी जुलै महिन्यात सुरू झाली होती. सध्या या लशीची अजूनही सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram