आपला जिल्हा

राज्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अमिताभ गुप्ता पुण्याचे नवे आयुक्त.

अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.

राज्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अमिताभ गुप्ता पुण्याचे नवे आयुक्त.

अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.

पुणेः बारामती वार्तापत्र रिपोर्ट

गणेशोत्सव संपताच राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अमिताभ गुप्ता यांची पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी तर डॉ. के. व्यंकटेशम यांची विशेष अभियान महाराष्ट्र राज्याच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रात्री उशिरा हे बदली आदेश काढण्यात आले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून पुणे पोलिस आयुक्तांची बदली होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. गेल्या महिन्यात काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर डॉ. व्यंकटेशम् यांना मुदतवाढ दिल्याचे बोलले जात होते. मात्र गुरुवारी रात्री उशीरा गृह विभागाने राज्यातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. डॉ. व्यंकटेशम् यांची बदली अपर पोलिस महासंचालक (विशेष अभियान) या पदावर करण्यात आली आहे. याबरोबरच २२ पोलिस अधीक्षक यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले असून पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पदी अभिनव देशमुख यांची बदली करण्यात आली आहे.

बघा कुठल्या अधिकाऱ्याची कुठे बदली झाली….

Related Articles

Back to top button