फायनान्स वसुली अधिकाऱ्यांना इंदापूर तालुक्यात फिरण्यास बंदी करावी-अरुण राऊत.
कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली.
फायनान्स वसुली अधिकाऱ्यांना इंदापूर तालुक्यात फिरण्यास बंदी करावी-अरुण राऊत
कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली.
इंदापूर:-प्रतिनिधी
खासगी फायनान्स, बचत गट फायनान्स चे वसुली अधिकारी हे गावोगावी तसेच घरोघरी फिरत असल्याने कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे इंदापूर युवक काँग्रेसचे सरचिटणीस अरुण राऊत यांनी याबाबत इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांना निवेदन देण्यात आले.
इंदापूर तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला असून त्यामुळे प्रशासनाने इंदापूर तालुक्यात जनता कर्फ्यू लागू केला आहे व त्यास प्रतिसाद देत सर्व इंदापूर मधील जनता सहभागी झालेचे दिसून येत आहे.परंतु इंदापूर तालुक्यामध्ये कार्यरत असलेले खासगी फायनान्स, बचत गट फायनान्स चे वसुली अधिकारी हे एका दिवसामध्ये दहा ते पंधरा गावांमध्ये जात असून काही बचत गट फायनान्स चे वसुली अधिकारी हे इतर जिल्ह्याबाहेरील सोलापूर जिल्ह्यातील असल्याने त्यांच्या मार्फत कोरोना पसरण्याचा धोका निर्माण झाला असल्याकारणाने त्यांना गावोगावी फिरण्यास बंदी करावी अन्यथा इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल सावंत, इंदापूर तालुका शहरध्यक्ष तानाजी भोंग, उपाध्यक्ष बिभीषण लोखंडे व युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर प्रशासकीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा इंदापूर युवक काँग्रेसचे सरचिटणीस अरुण राऊत यांनी दिला आहे.