आजचा आकडा दिलासादायक…आज बारामतीत एकुण २६ पाॅझिटीव्ह.
![](https://baramatiwarta.in/wp-content/uploads/2020/09/IMG-20200906-WA0028.jpg)
आजचा आकडा दिलासादायक…आज बारामतीत एकुण २६ पाॅझिटीव्ह.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील काल झालेल्या तपासणीदरम्यान तपासण्या कमी झाल्या असल्या तरी कोरोनाबाधितांचेही प्रमाण कमी झाले आहे. १६१ तपासण्या काल झाल्या, त्यापैकी २६ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. परवा ३२१ जणांच्या तपासण्यांतून ५५ जण कोरोनाबाधित आढळले होते.
दिनांक 19/ 9 /20 रोजीच्या प्रतीक्षेत असलेल्या 19 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती शहरातील सूर्य नगरी येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला असून उर्वरित नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे तसेच कालचे (20/09/20) एकूण rt-pcr नमुने 118. एकूण पॉझिटिव्ह- 20. प्रतीक्षेत 06. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. कालचे एकूण एंटीजन 43. एकूण पॉझिटिव्ह-05 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 01+20+05=26. शहर- 21 ग्रामीण- 05 एकूण रूग्णसंख्या-2668 एकूण बरे झालेले रुग्ण- 1432 एकूण मृत्यू– 64.
बारामती तालुक्यात आज आढळलेल्या शासकीय तपासणीतील कोरोनाग्रस्तांमध्ये काटेवाडी येथाील २८ वर्षीय युवक, सोमेश्वरनगर येथील २८ वर्षीय पुरूष, करंजे येथील ५० वर्षीय पुरूष, विश्वासनगर येथील ५५ वर्षीय महिला, संघवी हाईटस येथील २० वर्षीय युवक, ५९ वर्षीय पुरूष, ७० वर्षीय महिला, ३५ व्रषीय महिला, सूर्यनगरी येथील ४० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
सोनाई इस्टेट जळोची येथील ३० वर्षीय पुरूष, मळद रोड येथील ४५ वर्षीय पुरूष, पाटस रोड येथील ११ वर्षीय युवक, पाटस रोड येथील ३८ वर्षीय पुरूष, रुई पाटी येथील ५३ वर्षीय पुरूष, इंदापूर रोड येथील ६ वर्षीय मुलगा, काटेवाडी येथील ४२ वर्षीय पुरूष, देसाई इस्टेट येथील ३७ वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय महिला, निंबूत येथील ६० वर्षीय पुरूष, जळोची येथील २१ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
खासगी मंगल लॅबोरेटरी येथे झालेल्या तपासणीमध्ये तपोवन कॉलनीतील ६० वर्षीय पुरूष, अवचट इस्टेट येथील ७ वर्षीय मुलगा, १० वर्षीय मुलगा, ३३ वर्षीय महिला, माळेगाव रोड कुंभारवस्ती येथील २५ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
पुरंदर तालुक्यातील एकाचा समावेश
निरा येथील ४३ वर्षीय पुरूष बारामतीतील तपासणीमध्ये कोरोनाबाधित आढळला आहे.