विद्यार्थ्यांच्या परिपोषण आहाराच्या बिलासाठी मा.नगराध्यक्ष रत्नाकर मखरे अखेर हायकोर्टात.
मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल.
विद्यार्थ्यांच्या परिपोषण आहाराच्या बिलासाठी मा.नगराध्यक्ष रत्नाकर मखरे अखेर हायकोर्टात.
मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
सन-२०१८-१९ व १९-२० चे आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांचे परीपोषण आहाराचे अनुदान शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने मार्च 2020 चे पूर्वी देणे नियमानुसार बंधनकारक असताना मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित भिमाई प्राथमिक आश्रमशाळा इंदापूर (निवासी), क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले माध्यमिक आश्रमशाळा इंदापूर (निवासी), व राजमाता अहिल्यादेवी होळकर कनिष्ठ महाविद्यालय इंदापूर (कला, विज्ञान निवासी) या शाळेत राहून शिक्षण घेणारे विद्यार्थी हे विमुक्त जाती भटक्या जमाती ( VJNT) प्रवर्गातील असून या प्रवर्गातील आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांचे पोषण आहाराचे गतवर्षीचे अनुदान उद्याप पर्यंत दिले नाही.
राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित खात्याचे मंत्री, अधिकारी यांनी या सर्व प्रकरणाकडे दुर्लक्ष केले असून, मागील सरकारने जे केले तेच हे सरकार करीत आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे मत माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी व्यक्त केले.
भटका विमुक्त समाज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्याचा शासनात बसलेल्या व प्रशासनात काम करणाऱ्या लोकांचा हेतू नाही ना ? मी व माझ्या संस्थेतील ५० कर्मचारी सदरील प्रश्नासाठी प्रशासकीय भवन इंदापूर तहसीलदार कचेरी समोर दि. ५ सप्टेंबर 2020 म्हणजेच शिक्षकदीना पासून बेमुदत धरणे आंदोलनास बसलो आहोत. उच्च वर्णीयांसाठी शासन प्रशासन काम करीत आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार जी धडपड करत आहे. तशा प्रकारची धडपड भटक्या विमुक्तांसाठी करताना सरकार दिसून येत नाही.
तत्कालीन युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे हे असताना इंदापूर येथील शेटफळ येथील धरणाची उंची वाढविणे संदर्भात कार्यक्रम असताना तेव्हा देखील असाच अनुदाना संदर्भातील प्रश्न होता.आम्ही तेथे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसह मोर्चा नेला होता.स्वतः ना.मुंडे यांनी आमच्या मोर्चाला सामोरे येऊन आमच्या समस्या जाणून घेतल्या. व दोन दिवसात आमच्या थकीत अनुदानाचा प्रश्न स्व. गोपीनाथ मुंडे यांनी त्याकाळी मार्गी लावला होता.ते स्वतः भटक्या विमुक्त जाती जमाती व वंचितांचे नेतृत्व करत होते.त्यांना VJNT च्या प्रश्नाबाबत जाणं होती. आजच्या स्थितीत राज्याचे विद्यमान मंत्री ना.डॉ.जितेंद्र आव्हाड,ना.धनंजय मुंडे, राज्यमंत्री इंदापूरचे सुपुत्र ना. दत्तात्रय भरणे तसेच शिवसेना खासदार व इंदापूरचे सुपुत्र राहुल शेवाळे हे सत्तेतील नेते आहेत.हे देखील VJNT व बहुजनांचे नेतृत्व सक्षमपणे करत आहेत.
ह्या नेत्यांनी जर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कानावर VJNT च्या निवासी विद्यार्थ्यांच्या देय अनुदाना संदर्भातील प्रश्न घातला तरी तो लवकर मार्गी लागेल अशी आशा असल्याचे मखरे यांनी म्हंटले असून अनुदान त्वरित मिळावे यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.