जर तुमच्याकडे 15 वर्ष जुनी गाडी असेल तर ‘ड्रायव्हिंग’ करताना ‘या’ नियमांचे करा पालन, जाणून घ्या
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या ही व्यवस्था फक्त देशाच्या राजधानीतच लागू आहे.
जर तुमच्याकडे 15 वर्ष जुनी गाडी असेल तर ‘ड्रायव्हिंग’ करताना ‘या’ नियमांचे करा पालन, जाणून घ्या
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या ही व्यवस्था फक्त देशाच्या राजधानीतच लागू आहे
नवी दिल्ली, बारामती वार्तापत्र
आपल्याकडेही 15 वर्ष जुनी गाडी असेल तर सावधगिरी बाळगा कारण सरकार वाहतुकीच्या नियमात कठोर बदल करणार आहे. देशातील रस्त्यांवरून 15 वर्ष जुनी वाहने काढण्यासाठी लवकरच सरकार एक नवीन यंत्रणा बनवणार आहे. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा उपाय केला जात आहे. जर वाहन मालकाने आपल्या 15 वर्षाच्या जुन्या वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र घेतले नाही तर त्याच्या वाहनाचे रजिस्ट्रेशन आपोआप रद्द होईल.
सध्या ही यंत्रणा दिल्लीत लागू आहे
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या ही व्यवस्था फक्त देशाच्या राजधानीतच लागू आहे, जिथे 15 वर्ष जुन्या पेट्रोल आणि दहा वर्ष जुन्या डिझेल वाहनांची नोंदणी आपोआप रद्द केली जाते.
तर अन्य ठिकाणी वाहनासाठी 15 वर्षानंतर फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागते. एकदा फिटनेस प्रमाणपत्र प्राप्त झाल्यास वाहन पाच वर्षे रस्त्यावर चालविले जाऊ शकते. जर कोणी त्यांच्या वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र घेतले नाही तर ते वाहन नोंदणीकृत नसल्याचे समजले जाते.
नवीन मोटार वाहन कायदा अधिक कठोर
विशेष म्हणजे नवीन मोटार वाहन कायद्यानुसार, वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यास 10 पटीपर्यंत चालान व लायसेन्स जप्त करण्यासारखी कठोर कारवाई केली जाऊ शकते. थोड्याशा निष्काळजीपणामुळे तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
रहदारीशी संबंधित या नियमांचे देखील करा पालन
– वाहन चालवताना फोनचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. जर फोनवर बोलणे आवश्यक असेल तर गाडी थांबवून बोलावे. जर आपण इतर कोणत्याही कामासाठी फोन चालवताना दिसल्यास आपल्यावर मोठा दंड आकारण्यात येईल आणि आपले लायसेन्स देखील जप्त केले जाऊ शकते.
– झेब्रा क्रॉसिंगवर विशेष लक्ष द्या जेणेकरून पादचारी सहज रस्ता ओलांडू शकतील. नियमानुसार झेब्रा क्रॉसिंगच्या मागेच वाहन थांबविले पाहिजे. ट्रॅफिक पोलिस हवे असल्यास लायसेन्स देखील जप्त करू शकतात.
– ड्रायव्हिंग करताना काचा उघडून जोरात म्युझिक वाजवणे देखील नियम तोडण्याच्या यादीमध्ये आहे. याकरिता वाहतूक पोलिस 100 रुपये दंड आकारू शकतात किंवा ते लायसेन्स देखील जप्त करू शकतात.