महाराष्ट्र

…म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी राज्यातील सरकार पडू देत नाही; माजी मंत्र्यानं दिला तर्क

माजी मंत्री राम शिंदे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे केवळ सत्तेला चिकटून बसलेले सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

…म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी राज्यातील सरकार पडू देत नाही; माजी मंत्र्यानं दिला तर्क

माजी मंत्री राम शिंदे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे केवळ सत्तेला चिकटून बसलेले सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

अहमदनगर:बारामती वार्तापत्र

‘राज्य सरकारला महाराष्ट्रातील जनतेचे घेणेदेणे नाही. केंद्र सरकार वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी, जनता यांना मदत करीत आहे. पण राज्य सरकारने कुठलीही जनतेला मदत केली नाही, असे चित्र महाराष्ट्रात पाहण्यास मिळत आहे. राज्य सरकार म्हणजे केवळ सत्तेला चिकटून बसलेले सरकार एवढीच त्यांची व्याख्या आहे,’ अशी टीका माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी राज्य सरकारवर केली.

दिवंगत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगरमध्ये शहर भाजपच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शिंदे उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. ‘सहा महिन्याच्या आत अधिवेशन घ्यायचे असते. त्यानुसार राज्य सरकारने दोन दिवस अधिवेशन घेतले. मात्र त्या अधिवेशनात एका पत्रकार व एका सेलिब्रिटीवर सरकारने प्रस्ताव आणला. यावरूनच राज्य सरकारला महाराष्ट्रातील जनतेचे देणेघेणे नाही, हे दिसून येते. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ गेला असला तरी रुग्णांना सुविधा देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारच्या काळात मोठे घोटाळे झाले आहेत. गव्हाचा घोटाळा असेल, तांदळाचा घोटाळा असेल. कारण केंद्र सरकारने लोकांसाठी दिलेले अन्नधान्य पोहोच करण्याची दानत सुद्धा राज्य सरकारमध्ये राहिलेली नाही. समन्वय नसलेले हे सरकार आहे,’ असेही ते म्हणाले.

यावेळी शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगलं कळतं की आपण कुठेच नव्हतो. मात्र आता आपण सरकारमध्ये आहोत. त्यामुळे केवळ सरकार पडू द्यायचे नाही, सरकार चालवायचे आणि सरकारमध्येच राहायचं, असे त्यांचे काम चालू आहे. लोकांचा विकास, रस्ते, शेतकऱ्यांचे पंचनामे, दुष्काळ अशा प्रश्नांवर सरकार बोलण्यास तयार नाहीत. सरकारला अनेक क्षेत्रात अपयश आले आहे. हे विदारक चित्रच सरकारला भविष्यात खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या गोष्टीसाठी सरकारची नेमणूक झाली, त्या दिशेने त्यांना यश येताना दिसत नाही. त्यांच्याकडून कोणताही निर्णय होत नाही,’ असेही ते म्हणाले.

‘राज्याचे गृहमंत्री सांगतात की अधिकारी सरकार पाडायला निघाले. जर अधिकारी सरकार पाडायला निघाले असतील तर अशा प्रकारची ही स्वातंत्र्यानंतरची पहिली घटना म्हणावी लागेल. असे जर होत असेल तर मग सरकार करतय काय ? असा प्रश्नही प्रा. राम शिंदे यांनी उपस्थित केला. जे अधिकारी सरकार पाडायला निघाले आहेत , त्यांच्यावर सरकार कारवाई करत नाही. त्या अधिकार्‍याचे नाव सांगत नाही. हा सर्व प्रकार म्हणजे लक्ष विचलित करण्याचा आहे,’ असेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram