सुशांतसिंह प्रकरणी एनसीबी सक्रीय; सुप्रिया सुळेंनी सुचवला ‘हा’ मार्ग
सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी आता एनसीबी पथक देखील सक्रीय झालं आहे. आत्तापर्यंत एनसीबीनं बॉलिवूडमधील अनेक बड्या अभिनेत्रींना चौकशीकडून बोलवण्यात आलं होतं. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे.
सुशांतसिंह प्रकरणी एनसीबी सक्रीय; सुप्रिया सुळेंनी सुचवला ‘हा’ मार्ग
पुणेः बारामती वार्तापत्र
सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी आता एनसीबी पथक देखील सक्रीय झालं आहे. आत्तापर्यंत एनसीबीनं बॉलिवूडमधील अनेक बड्या अभिनेत्रींना चौकशीकडून बोलवण्यात आलं होतं. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे.
सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयनंतर एनसीबीनंही कसून चौकशी सुरू केली आहे. सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीला ड्रग्ज पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेट खणून काढण्याच्या उद्देशानं एनसीबीचा तपास सुरू आहे. रियानं व अन्य आरोपींनी दिलेल्या कबुलीजबाबानंतर एनसीबीनं बॉलिवूडमधील बड्या कलाकारांना चौकशीसाठी बोलावलं होतं. यामध्ये दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत, श्रद्धा कपूर या अभिनेत्रींचा समावेश आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र या चौकशीवर रोखठोक मत व्यक्त केलं आहे.
‘ड्रग्जप्रकरणी, फक्त हाय प्रोफाइल महिलांना चौकशीसाठी बोलवून काहीही साध्य होणार नाही, हा गंभीर विषय आहे. याला मुळापासून आळा घालणं गरेजेचं आहे. राज्यात आपण तंबाखू मुक्त अभियान राबवत आहोत. त्याचप्रमाणे केंद्र सरकारनंही ड्रग्जमुक्त भारत अभियानासारखे प्रयोग राबवले पाहिजे,’ अशी ठाम भूमिका सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे.