काल बारामतीत चाचणी झालेल्यांपैकी एकुण ६७ जण कोरोना बाधीत…
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३४०१ वर गेली आहे.
काल बारामतीत चाचणी झालेल्यांपैकी एकुण ६७ जण कोरोना बाधीत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३४०१ वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (२/१०/२०२०) एकूण rt-pcr नमुने १३६. एकूण पॉझिटिव्ह- ३५. प्रतीक्षेत ००. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -०१. काल खाजगी प्रयोगशाळेमध्ये केलेले एकूण rt-pcr- २० त्यापैकी पॉझिटिव्ह -०३. कालचे एकूण एंटीजन ७४. एकूण पॉझिटिव्ह-१८ . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३५+०३+१८=५६. शहर-२५ . ग्रामीण- ३१. एकूण रूग्णसंख्या-३३९० एकूण बरे झालेले रुग्ण- २७०७ एकूण मृत्यू– ८७. तसेच “काल माझे कुटुंब माझी जबाबदारी” या उपक्रमांतर्गत कन्हेरी याठिकाणी ऍक्टिव्ह सर्वे करण्यात आला त्यामध्ये एकूण ५१ संशयितांपैकी ५१ जणांची अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली त्यामध्ये ११ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत त्यामुळे बारामतीची रुग्ण संख्या ३३९० + ११ = ३४०१ झालेली आहे.
बारामतीतील शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये माळेगाव बुद्रुक येथील ३८ वर्षीय महिला, गुनवडी येथील ५१ वर्षीय पुरूष, मळदरोड येथील ३३ वर्षीय महिला, सोमेश्वरनगर येथील ५० वर्षीय पुरूष, शिवकाशीनगर येथील ५६ वर्षीय पुरूष, तांदूळवाडी येथील ३९ वर्षीय पुरूष, खंडोबानगर येथील ६८ वर्षीय पुरूष, म्हाडा कॉलनी येथील ४२ वर्षीय पुरूष, कसबा येथील ३८ वर्षीय पुरूष संभाजीनगर येथील ५० वर्षीय महिला, माळेगाव येतील २ वर्षीय मुलगा, मुक्ती व्हिलेज येथील ६७ वर्षीय पुरूष, पणदरे येथील २२ वर्षीय युवक, विद्यानगर इस्टेट येथील ४३ वर्षीय महिला, पारवडी येथील ३१ वर्षीय पुरूष, रुई येथील ३६ वर्षीय पुरूष, पवारवाडी येथील ३८ वर्षीय पुरूष, ढेकळवाडी येथील ३० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील शासकीय रॅपीड अॅंटिजेन तपासणीत तांदूळवाडी येथील ३१ वर्षीय पुरूष, जळोची रोड येथील ३७ वर्षीय पुरूष, माळेगाव येथील ४२ वर्षीय पुरूष, तांदूळवाडी येथील १७ वर्षीय युवक, सांगवी येथील ५० वर्षीय महिला, सांगवी येथील ३० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील खासगी मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपीड अॅंटिजेन तपासणीत कटफळ येथील ६० वर्षीय महिला, रुई येथील ४५ वर्षीय पुरूष, ४० वर्षीय महिला, सावळ वीरकरवस्ती येथील ३० वर्षीय पुरूष, सूर्यनगरी साई सदन अपार्टमेंट येथील २४ वर्षीय पुरूष, खंडोबानगर येथील ३९ वर्षीय पुरूष, सहयोग सोसायटीजवळील ५६ वर्षीय पुरूष, पाटस रोड येथील २७ वर्षीय महिला, अशोकनगर येथील निबाजिया निवास येथील ४९ वर्षीय पुरूष, कसबा येथील ५७ वर्षीय पुरूष, आनंदनगर येथील झवेरी रेसिडेन्सी येथील ६३ वर्षीय पुरूष, जामदार रोड येथील ३१ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.