महाराष्ट्र

सुशांतची आत्महत्या की हत्या? अखेर AIIMS च्या डॉक्टरांनीच केला मोठा खुलासा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाचा गेल्या 3 महिन्यांपासून तपास सुरू आहे.

सुशांतची आत्महत्या की हत्या? अखेर AIIMS च्या डॉक्टरांनीच केला मोठा खुलासा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाचा गेल्या 3 महिन्यांपासून तपास सुरू आहे.

सुशांतने आत्महत्या केली की हत्या? या प्रश्नभोवती गेल्या तीन महिन्यापासून मुंबई पोलीस आणि नंतर सीबीआयने तपास केला. पण, आता AIIMS हॉस्पिटलच्या रिपोर्टमध्ये या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे.

सुशांत प्रकरणात दिल्लीतील​त अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) च्या डॉक्टरांच्या टीमने सीबीआयकडे आपला अहवाल सुपूर्द केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, AIIMS च्या डॉक्टरांनी सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली असावी, या थेअरीला नकार दिला आहे. सुशांतची हत्या झाली नाही, असं या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

सुशांतच्या कुटुंबियांनी आणि त्याच्या वकिलांनी सुशांतला आधी विष देऊन मारले आणि नंतर गळफास देण्यात आला असा आरोप केला होता.

पण AIIMS च्या डॉक्टरांनी या प्रकरणाचा पूर्ण तपास केला. सुशांतच्या गळ्यावर असलेले ligature मार्क आणि शवविच्छेदनात स्पष्ट करण्यात आलेली मृत्यूची वेळ व इतर तथ्यांनुसार, सुशांतची हत्या झाली असावी असं म्हणता येणार नाही, असं डॉक्टरांच्या टीमने स्पष्ट केले आहे.

14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील वांद्रे परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेतला होता. सुरुवातील या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी केला होता. मुंबई पोलिसांनी सुशांतने आत्महत्या केली, असं स्पष्ट केले होते. परंतु, सुशांतने आत्महत्या केली नसून हत्या केली, असा आरोप कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. अखेर हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आणि सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाच्या तपासाला सीबीआयला परवानगी दिली. पण, आता या प्रकरणात एम्सच्या डॉक्टरांनीही सुशांतची हत्या झाली असावी, हे नाकारलं आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा ड्रग्ज अँगलने तपास करणाऱ्या एनसीबीला रियाच्या घरातून दीड किलो ड्रग्ज जप्त केलं आहे. यामध्ये चरस आणि गांजा आहे. यामुळे आता रिया आणि तिचा भाऊ शोविकला 10 ते 20 वर्षे तुरुंगवास होऊ शकतो, अशी माहिती तपास अधिकाऱ्याने दिल्याचं वृत्त दैनिक भास्करने दिलं आहे. रिया आणि शोविकच्या घरातून किती ड्रग्ज सापडलं आहे, हे त्यांच्या वकिलांनाही माहिती नाही, असंदेखील या अधिकाऱ्यानं सांगितलं. ड्रग्ज घेतल्याने आणि त्याचा व्यवहार केल्याने रियाला 9 सप्टेंबरला अटक करण्यात आली. 6 ऑक्टोबरपर्यंत तिला न्यायालयीन कोठडी सुनाण्यात आली. तसंच दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांचीही चौकशी करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button