आज इंदापूर तालुक्यात २५ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
आज दिवसभरात दोन जणांचा मृत्यू झाला.
आज इंदापूर तालुक्यात २५ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
आज दिवसभरात दोन जणांचा मृत्यू झाला.
इंदापूर : बारामती वार्तापत्र
आज इंदापूर तालुक्यात झालेल्या ६८ अॅंटीजेन तपासण्यांमध्ये २९ जण कोरोनाबाधित आढळून आले. आज आरटीपीसीआर तपासणी झाली नाही. बारामतीतील तपासणीत एक जण कोरोनाबाधित आढळून आला. आज दिवसभरात दोन जणांचा मृत्यू झाला.
आज आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये रणगाव येथील ३८ वर्षीय पुरूष, २८ वर्षीय महिला, २९ वर्षीय पुरूष, जंक्शन येथील ४६ वर्षीय महिला,, २९ वर्षीय पुरूष, ८ वर्षीय मुलगी, रत्नपुरी येथील ३५ वर्षीय महिला, १५ वर्षीय मुलगा, १८ वर्षीय युवतीचा समावेश आहे.
पळसदेव येथील ५५ वर्षीय पुरूष, भिगवण येथील ७५ वर्षीय पुरूष, ६० वर्षीय पुरूष, खोरोची येथील ५२ वर्षीय पुरूष, सरडेवाडी येथील २८ वर्षीय महिला, ४९ वर्षीय पुरूष, ४ वर्षीय मुलगा, १९ वर्षीय युवकाचा समावेश आहे.
निमगाव केतकी येथील ५५ वर्षीय महिला, लाखेवाडी येथील ३८ वर्षीय महिला, इंदापूर येथील १९ वर्षीय युवक, २१ वर्षीय युवती, ४६ वर्षीय महिला, २५ वर्षीय महिला, लाकडी येथील २८ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.