अजितदादांनी केली बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी
कामासंदर्भात अधिकाऱ्यांना केल्या काही सूचना
अजितदादांनी केली बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी
कामासंदर्भात अधिकाऱ्यांना केल्या काही सूचना
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध विकास कामांची पाहणी केली आणि सूचना दिल्या अजित पवार हे आठवड्याच्या शनिवार-रविवार बारामतीमध्ये असतात .
अजितदादांनी केलेल्या पाहणीचा व्हिडीओ येथे पहा किंवा बारामती वार्तापत्र फेसबुक पेजवर पाहा.
ते विविध विकास कामांची पाहणी करतात आज बारामती मध्ये त्यांनी निरा कालवा दुरुस्ती, गुनवडी शिवाजी चौक रुंदीकरणासह ,अत्याधुनिक प्रस्तावित बसस्थानक, पोलिस मुख्यालय, शिवसृष्टी, वन उद्यान, पोलिस वसाहत, चिंकारा उद्यान, अॅडव्हेंचर पार्क, निरा कालवा दुरुस्ती, प्रस्तावित टाऊन हॉल, पाणी साठवण तलाव, रस्ते रुंदीकरण,विविध कामांची पाहणी करीत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. अजितदादा आज पूर्ण शहरात फिरून विकासकामांची पाहणी करताना व माहिती घेताना दिसल्याने नागरिकांनी देखील गर्दी केली होती.