
कऱ्हा नदी च्या पुरात वाचवले युवकाचे प्राण
पोलीस प्रशासनाचे सहकार्य
बारामती वार्तापत्र
सोमवार दिनांक 12 ऑक्टोम्बर रोजी सांयकाळी सात च्या सुमारास कऱ्हा नदीला आलेल्या पुरा मध्ये युवकाचे प्राण वाचविण्यात प्रशासन ला अखेर यश मिळाले आहे.कऱ्हा नदी च्या लहान पुलावर नळीत दोन तरुण अडकले होते नगरपालिकेचे संजय प्रभुणे यांनी सदर बाब होमगार्ड महेश खामगळ यांना सांगितली.
बारामती शहरातील आप्पासाहेब पवार मार्गालगत जुन्या पुला जवळ पाण्यात तोल जाऊन पडलेल्या दोन युवकांना पोलिसानी स्थानिक तरुणांच्या मदतीने जवळपास एक तासाच्या प्रयत्नानंतर पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.
दोन दिवसांपासून बारामती परिसरात पावसाच्या जोरदार पाऊस पडत आहे, शिवाय नाझरे धरणातूम सोडलेल्या पाण्यामुळे कऱ्हा नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याचा वेग प्रचंड आहे. घटस्थापनेमुळे सोमवारी एकच्या सुमारास कपडे धुण्यासाठी आलेल्या ऋतू हिम्मत भोसले (वय १८) व बंटी भोसले (वय १६) हे दोन भाऊ कपडे धुत असताना त्यांचा तोल जाऊन ते पुराच्या पाण्यात पडले. त्यांनी पुरात वाहून गेलेल्या लहान पुलाला पकडून ठेवले, मात्र हा पूल वाहून गेला असल्याने सिमेंटच्या पाईपमध्ये अडकून पडले.
दरम्यान, वरून पाण्याच्या प्रचंड दबावाने त्या दोघांना पाण्यातून बाहेर येता येत नव्हते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस व स्थानिक तरुण मदतीला धावले व जवळपास अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने बंटी भोसलेला बाहेर काढण्यात यश आले. तर ऋतू मात्र पाण्यातील झुडपात अडकवून बसला होता व मदतीची याचना करत होता.
पोलिसांनी तेथे असणाऱ्या साडीच्या मदतीने किशोर लोखंडे याने सावधपणे ऋतूला बांधत विरुद्ध दिशेला ओढले याच वेळी पोलिसांनी या तरुणाला वर ओढून त्याचे प्राण वाचवले घडलेला प्रकार लक्षात आल्यावर फौजदार पद्मराज गंपले व योगेश शेलार, पोलिस कर्मचारी पोपट नाळे ,राजभाऊ गायकवाड, तुषार चव्हाण, बापू इंगुले, होमगार्ड पी. खांमगळ, बारामती नगर परिषदेचे अधिकारी संजय प्रभुणे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत जाधव, किशोर लोखंडे या तरुणांनी दोघांचे प्राण वाचवले.