कोरोंना विशेष

काल बारामतीमध्ये १७ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३८४६ वर गेली आहे.

काल बारामतीमध्ये १७ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३८४६ वर गेली आहे.

बारामती वार्तापत्र

कालचे शासकीय (१६\१०\२०२०) एकूण rt-pcr नमुने ५५. एकूण पॉझिटिव्ह- १०. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -१९ त्यापैकी पॉझिटिव्ह -०३. कालचे एकूण एंटीजन ३८. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-०४ . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १०+०३+०४=१७. शहर-०९ . ग्रामीण- ०८. एकूण रूग्णसंख्या-३८४६ एकूण बरे झालेले रुग्ण- ३५५३ एकूण मृत्यू– १०५.

बारामती मध्ये काल झालेल्या वेगवेगळ्या तपासण्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये समर्थ नगर येथील 70 वर्षीय पुरुष, तुळजाराम चतुरचंद कॉलेज रोड येथील 40 वर्षीय पुरुष, ओझर्डे कॉम्प्लेक्स येथील 18 वर्षीय युवक, 13 वर्षीय युवती, पतंगशहा नगर येथील 42 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, कसबा येथील तीस वर्षीय पुरुष, वाणेवाडी येथील वीस वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगी व 53 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.

बारामतीतील शासकीय रॅपिड तपासणीमध्ये सदोबाची वाडी येथील 52 वर्षीय महिला पाहुणेवाडी येथील 42 वर्षीय पुरुष जळोची येथील 28 वर्षीय पुरुष व जंक्शन येथील तीस वर्षीय पुरुष रुग्ण कोरूना बाधित झाले आहेत.

बारामतीतील मंगल लॅबरोटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये नेवसे रोड येथील 30 वर्षीय पुरुष, एसटी स्टँड मागे 42 वर्षीय पुरुष सूर्यनगरी इंदू बंगला येथील 19 वर्षीय युवक, 13 वर्षीय मुलगा, 47 वर्षीय पुरुष, मार्केट यार्ड शेजारील उन्मेश बंगला येथील 40 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरुष, रुई पाटी येथील 48 वर्षीय महिला, तपोवन कॉलनी येथील तीस वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.

Related Articles

Back to top button