काल बारामतीमध्ये २६ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३८७२ वर गेली आहे.
काल बारामतीमध्ये २६ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३८७२ वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (१७\१०\२०२०) एकूण rt-pcr नमुने ७९. एकूण पॉझिटिव्ह- १५. प्रतीक्षेत ००. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -०१. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -०९ त्यापैकी पॉझिटिव्ह -०३. कालचे एकूण एंटीजन ४७ . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-०८ . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १५+०३+०८=२६. शहर-१ . ग्रामीण- १४. एकूण रूग्णसंख्या-३८७२ एकूण बरे झालेले रुग्ण- ३५८३ एकूण मृत्यू– १०५.
बारामतीत काल झालेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये सांगवी येथील 35 वर्षीय पुरुष, 58 वर्षीय महिला, माळेगाव येथील 16 वर्षीय युवती, 15 वर्षीय मुलगा, सांगवी येथील 62 वर्षीय पुरुष, कुरणेवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, पणदरे येथील 31 वर्षीय पुरुष, भोंडवे वाडी येथील 24 वर्षीय पुरुष, जळोची येथील 5 वर्षीय मुलगी, बारामती शहरातील 60 वर्षीय महिला, काळे नगर येथील 55 वर्षीय पुरुष, आमराई येथील 48 वर्षीय महिला, माळेगाव येथील 27 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
काल बारामती मध्ये रॅपीड अंन्टिजेन तपासणी मध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सूर्यनगरी येथील 29 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 13 वर्षीय मुलगी, माळेगाव येथील 27 वर्षीय पुरुष, जळोची येथील चाळीस वर्षीय पुरुष, जळोची येथील 41 वर्षीय महिला, तांबे नगर येथील 19 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील मंगल लॅबरोटरी येथे तपासलेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये फरांदे नगर निंबुत येथील 38 वर्षीय पुरुष, खांडज येथील 74 वर्षीय पुरुष, बारामती बस स्थानका शेजारील 30 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
मंगल लॅबोरेटरी येथे आढळलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत ढाकाळे येथील साठ वर्षे पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे.